पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/148

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११२ ठेविलें, इतकेच नाही, तर त्यास एका लाकडी पिंजऱ्यांत कोंडून ठेविलें.तो कैदेत असतांना त्याचा मुलगा प्रसिद्ध भोज राजा याचा जन्म झाला. सिंधु राजाने चालुक्य चामुंडराज व अन्हिल वाड्याचा वल्लभ राजा यांच्याशी लढाया केल्या. नवसाहसांक चरित्रांत पद्मगुप्ताने सिंधुराज व नागराजाची कन्या शशिप्रभा यांचे भेटीचें, प्रेमाचे, व विवाहाचे हृदयंगम कथानक दिले आहे.' सिंधुराजा शैव होता. त्याचे मागून त्याचे गादीवर त्याचा मुलगा प्रसिद्ध भोजदेव हा बसला. १ ते थोडक्यांत अर्से आहे. सिंधु राजा एक दिवस शिकारीस गेला असतां एक हरिण त्याचे दृष्टीस पडले. त्याचे गळ्यांत सोन्याचा पट्टा होता. राजाने त्यास तीर मारिला. तो हरिण जखमी झाला खरा,परंतु पळून गेला. राजा पुढे चालला असतां आकाशांतून उडत जात असलेल्या हंसाचे तोंडांतून राजाचे पायापाशीं एक रत्नमाला पडली. त्या मालेतील रत्नावर राजकन्या शशिप्रभा असें नांव खोदलेले होते. इकडे राजकन्या शशिप्रभा ही नर्मदातटाकी बसली असतांना तिचा आवडता हरिण तिचे जवळ आला. तिने त्याचे शरिरांतील तीर उपटून काढिला. त्या तिरावर नवसाहसांकराजाचें नांव होते ते तिच्या दृष्टीस पडले, रत्नावरील नांव पाहून सिंधु राजाचे शशिप्रभेवर जसे प्रेम जडले, त्याप्रमाणेच शशिप्रभेचें नवसाहसाक राजावर प्रेम बसले. राजा जेव्हां नर्मदा नदीवर गेला, तेव्हां त्याची व शशिप्रभेची गांठ पडली. त्याचे बरोबर त्याचा प्रधान रुक्मांगद हा होता. ती सर्व नदीतीरी बसली असतांना एकदम एक मोठे तुफान झाले. त्या वादळाच्या योगाने शशिप्रभा व तिच्या दासी ह्या भोगावती नांवाचे नागनगरीस उडून गेल्या. इकडे एक आकाशवाणी झाली की, रत्नावती नगरात राहणाऱ्या वज्रांकुश नांवाच्या राक्षसास जो वीर मारील त्याला शाशप्रभेचा पिता शंखपाल शशिप्रभा देईल. राजाने शशिखंड नांवाचे विद्याधराचे मदतीने हे कृत्य केले. त्यानंतर शशिप्रभेचें व सिंधु राजाचे लग्न झालें.