________________
११० ३०० घोडे व बैलांच्या शंभर जोड्या घेतल्या. त्याने ९४१ ते ९७३ पावेतों राज्य केलें. . श्रीहर्ष देवाच्या मागून त्याचा ज्येष्ठ मुलगा दुसरा सियक, हा त्याचे गादीवर बसला. त्याला वाक्पति, उत्पलराज, मुंज, अमोघवर्ष, पृथ्वीवल्लभ, श्रीवल्लभ, व नरेंद्र अशी बिरुदे आहेत. त्याचे मुंज हे नांव पडण्याचे कारण असे सांगतात की, हर्ष राजा एक दिवस एका नदीच्या तीरावर फिरत असतांना मुंज जातीचे गवतांत नुकतेच उपजलेले एक मूल त्याच्या दृष्टीस पडले. आपल्या सेवकांकडून त्याने त्या मुलास आणविले. राजाला मूल नव्हते व या मुलाचा नालच्छेदहि झालेला नव्हता. तेव्हां राजाने या सांपडलेल्या मुलाला आपला मुलगा म्हणून वाढविले. मुंज नांवाचे गवतांत हा मुलगा सांपडला,म्हणून त्याला मुंज राजा असे नाव पडले. यानंतर हर्ष राजाला जो मुलगा झाला, तो एक दिवस नाहीसा झाला व शेवटी तो एका कुंजांत सांपडला. म्हणून त्याला कुंज राजा असें नांव पडले. हल्ली धारेजवळ मुंजसागर, व कुंजसागर असे दोन तलाव आहेत. ___ या राजाची कीर्ति भोज राजाचे खालोखाल आहे. तो मोठा संस्कृत पंडित व कवि होता. व विद्वान् लोकांचा तो मोठा आश्रयदाता होता. पद्यगुप्ताने त्यास कविमित्र व कविबांधव अशी विशेषणे दिली आहेत. मेरुतुंगाने त्याचे संबंधाने म्हटले आहे, " गते मुंजे यशःपुंजे निरालंबा सरस्वती " त्याने प्राकृत गौडवहो नांवाचे काव्य लिहिले आहे. त्याने कर्नाट, लाट, केरल, व चोल या लोकांचा पराभव केला. त्रिपुरीचा चेदिराजा युवराज यास जिंकलें. चालुक्य राजा दुसरा तैलप याजवर त्याने सोळा स्वाऱ्या केल्या, व एका प्रसंगी वर्धा नदीच्या काठी त्याचा पराभव करून