________________
माळव्याचे परमार ऊर्फ पवार राजे' । परमार वंश अग्निकुळ रजपूत यांच्यापैकी होता. हे परमार राजे प्राचीनकाळीं अबूचे पहाडाजवळ अचलगड व चंद्रावती नगर येथे राहात होते. यांचा मूळ पुरुष उपेंद्र उर्फ कृष्णराज नांवाचा होता. तो इ. स. ८०० पासून ८२५ पर्यंत राज्य करीत होता. त्याची व त्यानंतर झालेले वैरसिंह, सियक, वाक्पति व दुसरा वैरसिंह या राजांची फारशी खात्रीलायक माहिती मिळत नाही. वाक्पति व त्याची राणी कगला देवी यांनी एकुणचाळीस वर्षे राज्य केले व नंतर वानप्रस्थ ॐ श्रम धारण करून करुक्षेत्री त्यांनी वास केला, व आपले गादीवर त्यांनी आपला मुलगा दुसरा वैरसिंह यास बसविलें. हा वैरसिंह गयेस यात्रेकरितां गेला तेव्हां गौड देशचे राजासत्याने मदत केली. ते उपकार स्मरून त्या राजाने आपली मुलगी ललिता ही वैरसिंहास दिली. त्याने सत्तावसि वर्षे राज्य केले व तो आपले वयाचे एकाहत्तरावे वर्षों उज्जनीस मरण पावला. त्याचा मुलगा सियक हा त्याचे गादीवर बसला. त्याला श्रीहर्षदेव, व सिंहभट, असेही म्हणतात. त्याने हूण जातीचे यवनांचा व मान्य खेत येथील राष्ट्रकूट राजा होटिंग, याचा पराभव केला. त्याचे राणीचें नांव वडजा ऊर्फ वाग्देवी, असें होतें.. भोज प्रबंधांत तिला रत्नावली असेही म्हणतात. मान्यरेवतचे राजाकडून त्याने नऊ लाख दीनार नाणी, ४५ हत्ती, २१ रथ या भागांतील हकीकत विशेष करून मेजर ल्युअर्ड व रा. काशिनाथ कृष्ण लेले यांचे इंग्रजी निबंधाचे आधाराने लिहिली आहे.