Jump to content

पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/144

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

राजावर हल्ला करून त्यास ठार मारिले. परंतु १००३ साली त्याला कालंजरचा किल्ला महमदाचे स्वाधीन करणे भाग पडले. ___ याच सुमारास चेदीचा राजा गांगेय देव कलचुरी याचे मनांत उत्तर हिंदुस्थानांत आपली सत्ता स्थापन करण्याचे येऊन तिरहूतपर्यंत त्याने आपले राज्य वाढविले. त्याचा मुलगा कर्णदेव व गुजराथचा राजा भीम या दोघांनी मिळून माळव्याच्या प्रसिद्ध भोज राजाचा १०५३ साली पराजय केला. परंतु त्याच कर्ण. देवाचा कीर्तिवर्मा चंडेल याने १०४९ ते ११०० सालाचे दरम्यान पराभव केला. प्रबोधचंद्रोदय नांवाच्या प्रसिद्ध नाटकाच्या कर्त्यांचा आश्रयदाता हाच कीर्तिवर्मा होय. चंडेल राजांपैकीं सांगण्यासारखे असे अखेरचे नांव परमर्दि ऊर्फ परमाल याचे आहे. ११८२ साली पृथ्वीराज चव्हाणाने त्याचा पराभव केला, व १२०३ साली कुतुबुद्दिनाने त्याचा कलिंजर किल्ला घेतला. ___चंडेल राजे हे पुढे १६ व्या शतकापर्यंत कसे तरी जीव धरून होते. परंतु त्यांचे महत्त्व अगदी नाहीसे झाले होते. मोंगीर शहराजवळील गिधाऊरचा राजा हा त्यांचा वंशज आहे. चेदीच्या कलचुरी राजांचे नांव इ० स० ११८१ च्या पुढे ऐकू येत नाही. चेदीचे राजे त्रयकूटक नांवाचा शक वापरीत होते. त्याचा आरंभ इ० स० २४८-२४९ पासून झाला. पश्चिम हिंदुस्थानांत हा शक चालू होता.