पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/143

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०७ भुक्ति असे नांव होते. याच प्रांताला हल्ली बुंदेलखंड असे म्हणतात... या प्रांताचे दक्षिणेकडील भागास पूर्वी चेदीचा प्रांत म्हणत असत. तो प्रांत हल्ली साधारणपणे मध्यप्रांत या नावाने प्रसिद्ध आहे. या . दोन प्रांतांत इ. स. चे १० वे व ११ वे शतकांत चंदेल व कलचुरी नांवाच्या वंशजांचे राजे राज्य करीत असत. ____ इ. स. ८३१ चे सुमारास जेजाकभुक्तीच्या परिहार राजाचा पराभव करून नन्नक चंडेल हा त्या प्रांताचा मालक झाला. परिहारापूर्वी गहरवार राजे तेथें राज्य करीत होते. चंडेल राजांची मुख्य शहरें महोबा, कालंजर आणि खजुराहो अशी होती. त्या शहरांत त्यांनी भव्य मंदिरे व सुंदर सरोवरे बांधली. हे लोक मूळचे गोंड असून पुढे हिंदु झाले असावेत. प्रथम त्यांनी छत्रपूरचे राज्य मिळविले. ते वाढवीत वाढवीत यमुनानदीपावेतों कनोजचे सरहद्दीपर्यंत वाढविलें. हर्ष चंडेल यानें कनोजचे महीपाल राजास इ. स. ९१६ साली मदत केली. हर्षाचा मुलगा यशोवर्मा याने महीपाळाचा मुलगा देवपाळ यास एक मौल्यवान विष्णूची मूर्ति आपल्या मंदिराकरतां द्यावयास लाविली. यशोवाचा मुलगा ढंग नांवाचा होता. हा १०० वर्षांचा होऊन इ. स. ९९९ साली वारला. खजुराहो येथील मोठमोठी देवळे त्याने बांधली. ९८९ अथवा ९९० साली गझनीचे राजाचा सुभा सबक्तगीन याजवर हल्ला करण्याकरतां लाहोरचा राजा जयपाळ व अजमीर आणि कनोज येथील राजे यांनी जो कट केला, त्या कटांत तो सामील झाला. या सर्वांचा कुरम खोऱ्यांत मोठा पराभव झाला. पुढे इ. स. १००८ साली अनंगपाल राजाला ढंगचा मुलगा गंड हा सामील झाला. परंतु त्या दोघांचाही गझनीच्या महंमदानें पराभव केला. पुढे १३ वर्षांनी गंडाच्या मुलानें कनोजच्या