पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/142

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

विशाळ देवाने दिल्ली जिंकून घेतली असा लौकिक आहे. तो विद्वानाचा चाहता असून स्वतः त्याने हरकली नाटक लिहिले, व ललितविग्रहराज नाटक त्याचे बहुमानार्थ लिहिले आहे. तो इ. स. ११६३ साली मृत्यु पावला. त्याचे नंतर तीन राजे होऊन पुढे त्याचा पुतण्या प्रसिद्ध पृथ्वीराज चव्हाण हा राज्यारूढ झाला. (इ. स. ११७९.) पृथ्वीराजाने चंदेल राजा परमाल याचा पराभव केला व इ. स. ११८२ त महोबा शहर घेतले. व इ. स. ११९१ सालीं शहाबुद्दीनच्या फौजेचा पराभव करून त्यास सिंधू नदीपलीकडे हाकून लाविले. परंतु पुढील सालीं शहाबुद्दीन नवीन फौज घेऊन परत आला, व त्याने पृथ्वीराजाचा पराभव करून त्यास ठार मारिलें. (११९२ ) इ. स. ११९३ व इ. स. ११९४ मध्ये शहाबुद्दीनाने दिल्ली व कनोज शहरें घेतली. इ. स. ११९६ त ग्वाल्हेर, ११९७ त अन्हिलवाडा, व १२०३ सालीं कालंजर अशी शहरें घेतलीं, व उत्तर हिंदुस्थानचा तो पूर्ण मालक झाला. - त्याने कनोज शहर घेतल्यानंतर तेथे राहणारे गहरवार लोक हे रजपुतस्थानांतील मारवाडचे वालुकामय प्रदेशांत राहावयास गेले. तेच पुढे राठोड या नावाने प्रसिद्धीस आले, व त्यांची राजधानी जोधपूर हे शहर झाले. बाकीची रजपूत संस्थानांतील संस्थानहि याचप्रमाणे मुसलमानांच्या हल्ल्यामुळे स्थापित झाली. जेजाक भुक्तीचे चंडेल व चेदीचे कलचूरी लोक. यमुना व नर्मदा ह्या दोन नद्यांच्या मधल्या प्रदेशास जेजाक १ चंदबरदाई याने 'पृथ्वीराज राइसा ' नांवाचे काव्यांत पृथ्वीराजाचे सविस्तर चरित्र लिहिले आहे.