________________
चे सुमारास गहरवार कुळीचा राजा चंद्रदेव याने कनोज शहर घेऊन आपला वंश तेथे स्थापित केला. तो वंश इ० स० ११९३ पर्यंत चालला. त्या सुमारास शहाबुद्दीनाने कनोज शहराचा पूर्णपणे नाश केला. त्या सालीं राजा जयचंद हा कनोज सोडून काशीकडे पळून गेला. परंतु त्याचा पाठलाग करून शत्रूने त्यास मारिलें. हा जयचंद म्हणजे ज्याची रूपवती कन्या पृथ्वीराज चव्हाण ऊर्फ राई पिठोर याने स्वयंवर मंडपांतून उचलून घोड्यावर घालून नेली तोच होय. गहरवार वंशानंतर महोबाचे चंडेल राजे आठ पिढ्यांपर्यंत कनोजास राज्य करीत होते. दिल्ली. इंद्रप्रस्थ, कुरुक्षेत्र व दिल्ली ही सर्व शहरें एकच आहेत, अशा समजुतीमुळे दिल्ली शहर फार प्राचीन आहे, व त्याचा हिंदुस्थानाच्या सार्वभौमत्वाशी आजपर्यंत संबंध जुळविण्याची इंग्रज लोकांना संवय लागली आहे. त्यामुळे दिल्ली शहर इ० स० चे अकराव्या शतकांत मात्र स्थापन झाले, या गोष्टीची त्यांना अगदी विस्मृति पडते. पाटलिपुत्र, उज्जयिनी, काशी, प्रयाग वगैरे शहरें दिल्लीपेक्षां फार प्राचीन आहेत. दिल्लीची स्थापना अंगपाळ नांवाच्या रजपूत राजाने अकराव्या शतकांत केली. तेथील ज्या प्रसिद्ध लोहस्तंभावर चंद्रराजाचे स्तुतिस्तोत्र खोदले आहे, तो स्तंभ त्याने इ० स० १०५२ सालांत मथुरेहून तेथे आणिला. ___ सांभर ( शाकंभरी ) संस्थानांत अजमीर शहर होते. त्या संस्थानांन चव्हाण कुळीचे पुष्कळ रजपूत राजे झाले. त्यांपैकी पृथ्वीराज व विशाळदेव यांचीच नांवे लिहिण्यासारखी आहेत.