पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/140

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०४ हात. भोजराजा आदिवराहाचा अवतार होता अशी समजूत होती. त्याचे राज्य त्याचा मुलगा महेंद्रपाल याने कायम राखिले. महेंद्रपालाचा गुरु कर्पूरमांजरीचा कर्ता राजशेखर कवि हा होता. महेंद्रपालानंतर त्याचा मुलगा दुसरा भोज, व या भोजानंतर त्याचा सावत्र भाऊ महिपाल असे राजे झाले. (इ. स. ९१० ते ९४० ) इ. स. ९१६ त राष्ट्रकूटाचा राजा तिसरा इंद्र याने प्रतिहार वंशाचा पराभव केला, व कनोज शहर घेतले. या वेळेपासून कनोज राज्याचे वैभव कमी होऊ लागले. एकेक प्रांत त्याचे ताब्यांतून गेला. महिपालानंतर देवपाल व देवपालानंतर विजयपाल असे राजे झाले. इकडे गझनीचा सुलतान सबक्तगीन याचे हिंदुस्तानावर हल्ले सुरू झाले. त्याने पंजाबचा राजा जयपाळ याचा पराभव केला. त्या वेळेस कनोजचा राजा राज्यपाळ हा जयपाळचे बाजूस होता. इ. स. १०१८ त गझनीचा सुलतान महमुद हा कनोजवर चाल करून आला. तेव्हां राजपाळाने त्याच्याशी तह केला, व कनोज शहर सोडून देऊन, गंगेच्या दक्षिण तीरावरील बारी शहरांत तो रहावयास गेला. राज्यपाळ हा मुसलमानांना शरण गेला, ही गोष्ट हिंदु राजांना न आवडून त्यांनी कनोज शहरावर हल्ला केला व त्यास मारल. या कामांत चंडेलचा राजा गंड हा पुढारी होता. सुलतान महमद यास ही हकीकत कळली तेव्हां त्याला फार त्वेष आला, व तो इ० स० १० १९ त फौज घेऊन हिंदुस्तानावर चालून आला. इ० स० १०२० त त्याने बारी शहर घेतले, व तो गंड राजावर चाल करून गेला. तो राजा भयभीत झाला. महमुदास प्रतिरोध न करितां तो पळून गेला. पुढे इ० स० १०९०