Jump to content

पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/139

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०३ नाही. सदर प्रवासी दुसरा चंद्रगुप्त विक्रमादित्य याचे कारकीदीत कनोज शहरी आला. ( इ. स. ४ ०५ ) त्या वेळेस तेथे हीनयान बौद्धांचे तीन मठ व एक स्तूप होता. परंतु पुढे श्रीहर्ष राजाचे वेळेस तेथे शंभर मठ असून दहा हजार बौद्ध धर्माचे लोक होते. हर्षानें कनोज नगरी आपली राजधानी केली. गंगानदीच्या तीरावर ह्या शहराचा विस्तार सुमारे चार मैल होता. तथे सुंदर बागबगीचे व तलाव पुष्कळ होते, व तेथील रहिवासी उंची उंची रेशमी कपडे वापरीत असून ललितकलांत कुशल होते. - कनोज हे पूर्वी पांचाळ देशाची राजधानी होते. हर्षराजाचे मृत्यूनंतर ( इ. स. ६४७ ) आठव्या शतकांत यशोवर्मा सिंहासनारूढ झाला. प्रसिद्ध कवि भवभूति व वाक्पतिराज हे दोघे या राजाचे आश्रित होते. यशोवाला काश्मिरचा राजा ललितादित्य मुक्तापीड याने पदच्युत केले. (इ. स. ७४१ ). त्याचे मागून झालेला राजा वज्रायुध यालाही जयापीडाने पदच्युत केले इ. स. ८०० च्या सुमारास वज्रायुधाच्या नंतरचा राजा इंद्रायध याला बंगालचा राजा धर्मपाळ याने पदच्युत केलें. धर्मपाल स्वतः राज्य करीत नव्हता. त्याने राज्यकारभार चक्रायुधाकडे सोपविला. त्या चक्रायुधाला इ० स० ८१६ चे सुमाराला गुर्जर प्रतिहार राजा नागभट याने पदच्युत केले. त्याचा वंश बरेच वर्षे चालला त्याचेच वंशांत मिहिरभोज नांवाचा राजा झाला. ( इ. स. ८४० ते ८९० ) हा राजा मोठा पराक्रमी होता. त्याने पंजाबांतील सतलज नदीचे अलीकडील प्रांत, रजपुतस्थानाचा बराच मोठा भाग, आग्रा, अयोध्या व ग्वाल्हेर हे प्रांत काबीज केले. त्याचप्रमाणे काठेवाड प्रांत गुजराथ व माळवा हेही प्रांत त्याचे ताब्यांत आले. पूर्वेस त्याचे राज्य बंगाल्यापर्यंत होते. नैर्ऋत्य दिशेस राष्ट्रकूट व दक्षिणेस बुंदेलखंड प्रांतापर्यंत त्याचे राज्य विस्तारलें