पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/138

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०२ पार्थराजा आपल्या प्रजेस चाबकाने मारी परंतु त्याचा मुलगा उन्मत्तावंती लोकांना विंचवांचे दंश करवी. इतिहासकार लिहितो, "माझी कथा पुढे पाऊल टाकण्यास कचरते. या राजाचे वर्णन ऐकून भ्यालेल्या घोडीसारखी ती चमकून थबकते. " या राजाने प्रत्यक्ष आपल्या बापाचा खून केला. याच्या सर्व पशुतुल्य कृती लिहिणे हे फार घाणेरडे काम होईल. सुदैवाने त्याचे राज्य लवकरच संपले. त्यास एक भयंकर व्याधि जडली व त्यामुळे त्याचा इ०स० ९०९ वर्षी अंत झाला. दहाव्या शतकाच्या शेवटी काश्मिरांत दिदा नांवाची जुलमी राणी राज्य करीत होती. तिने सुमारे ५० वर्षे वाईट रीतीनें राज्यकारभार केला. अकरा व्या शतकांत कलश व हर्ष नांवाचे राजे झाले. हर्षाने शंकरवाप्रमाणेच देवळांची उत्पन्ने जप्त केली. ____ इ. स. १३३९ त एका मुसलमान वंशाकडे काश्मीरचे राज्य आले, व मुसलमानी धर्माचा जरी बराच प्रसार झाला, तरी त्या प्रांताच्या नैसर्गिक स्थितीमुळे अकबराच्या वेळेपर्यंत हिंदुस्थानच्या राजाच्या ताब्यांत तो गेला नाही. अकबराने इ. स. १९८७ साली तो जिंकून आपले राज्यांत सामील केला. - - दिल्ली, कनोज, अजमीर आणि ग्वाल्हेर. - कनोज, ऊर्फ कान्यकुब्ज हे फार प्राचीन नगर होय. महाभारतांत त्याचा उल्लेख आहे. व रिन. पू. चे दुसरे शतकांत पतंजलीने ते शहर प्रसिद्ध असल्याचे लिहिले आहे. त्याचा खात्रीलायक उल्लेख चिनी प्रवासी फाहि-एन याचे लेखापूर्वी सांपडत