________________
१०१ इ० स० ८५५ पासून ८८३ पावेतों अवंतीवमो नांवाचा राजा येथें राज्य करीत होता. तो विद्वान् लोकांचा मोठा अश्रयदाता होता. त्याचा प्रधान सुय्य याने फार उपयोगी असे तलाव व पाट बांधिले. त्याच्या नंतर शंकरवर्मा नांवाचा राजा झाला. तो जुलमी होता. ___ त्याचे राज्यांत ललिया नांवाचे ब्राह्मणाने काबूलच्या तुर्की शाहिया राजास पदच्युत केले व आपला हिंदू शाहिय नांवाचा वंश स्थापन केला. तो इ० स० १०२१ पर्यंत चालू होता. त्या साली मुसलमान लोकांनी तो नाहींसा केला. इ०स० ९१७ ते ९१८ सालांत पार्थ नांवाचा बाल राजा काश्मिरच्या गादीवर होता. त्याचा कारभार पंगू नांवाचा त्याचा बाप पाहत होता. त्याच्या कारकिर्दीत एक भयंकर दुष्काळ पडला. त्याचे वर्णन एका ब्राह्मण ग्रंथकाराने दिले आहे. एका ठिकाणी त्याने असे म्हटले आहे. “ वितस्ता ( झेलम ) नदीत इतकी प्रेजें फुगून पडली होती की, नदीचे पाणी दिसण्याची सुद्धा मारामार पडे. देशांत चोहीकडे सर्व जमिनीवर इतकी हाडे पडली होती की, पहाणारास आपण एकाद्या विस्तीर्ण स्मशानांत आहोत असे वाटे. राजाचे प्रधान व तंत्री ( सेनाधिकारी ) यांनी मात्र पूर्वीचे साठविलेले तांदूळ अति महाग भावाने विकून पुष्कळ द्रव्य मिळविले. तंत्री लोकांचे देणे देण्याकरितां, जो मनुष्य लोकांकडून अशा रीतीने पैसा वसूल करून ज्यास्त पैसा आपल्याला देईल अशा मनुष्याला राजा प्रधान नेमीत असे. आपण स्वस्थ घरांत बसून बाहेर प्रचंड वाऱ्यापावसाने लोकांचे हाल होत असलेले एखाद्या माणसाने पहात बसावे, त्याप्रमाणे हा क्रूर पंगू राजा आपल्या राजवाड्यांत बसून आपल्या सुखाची प्रशंसा करीत, प्रजेचे हाल पाहात असे. "