पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/135

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९९ लियन लोकांच्या झुंडी या मार्गाने येत असत म्हणून आहे. या प्रांतांत राहणारे पुष्कळ लोक मंगोलियन जातीचे आहेत. बंगाल प्रांतांत बौद्ध व हिंदु धर्मास में तांत्रिक रूप आले आहे, तें या प्रांतांत जे मंगोलिया प्रांताचे लोक येऊन राहिले त्यांच्या संसर्गामुळे आले. शाक्तपंथाचे कामाख्या नांवाचें में प्रसिद्ध मंदिर आहे, ते या प्रांतांत गौहाटी येथे आहे. जारणमारणादि मंत्रांचा हा देश असल्याबद्दल हिंदुस्थानांत त्याचा लौकिक आहे. ब्राह्मण लोक आर्येतर लोकांना व राजांना आपले धर्मात व आपले ताब्यांत कसे आणतात हे या देशाच्या धर्मविषयक इतिहासावरून चांगले समजतें. ____ या प्रांतांचे महत्त्व दुसऱ्या एका कारणामुळे आहे. तें कारण म्हटले म्हणजे शेवटपावेतों हा प्रांत मुसलमानांचे ताब्यांत गेला नाही. या कामी मुसलमानांचे सर्व प्रयत्न व्यर्थ गेले. बंगाल व बहार प्रांत काबीज करणारा बखत्यार याचा मुलगा महंमद याने या प्रांतावर इ. स. १२०४-५ सालाचे सुमारास स्वारी केली. पश्चिम सरहद्दीवर असलेल्या करतोया नदीच्या काठाकाठाने चाल करून दार्जिलिंगच्या उत्तर बाजूच्या पहाडापर्यंत त्याने प्रवेश केला. परंतु तेथून त्याला परत फिरावे लागले. कामरूपचे लोकांनी नदीवर असलेला पुष्कळ कमानीचा दगडी पल आयते वेळी पाड़न टाकला व त्यामुळे महंमदचे बहुतेक लोक नदीत बुडून मेले. महंमद स्वतः १०० स्वारांनिशी पोहून पार पडला परंतु तो आजारी पडला व सन १२०५-६ साली त्याचा कोणी खून केला. त्यानंतरच्याही मुसलमानांच्या स्वाऱ्या याप्रमाणे निप्फळ झाल्या. इ. स. १८१६ सालांत ब्रह्मी लोकांनी हा देश जिंकीपर्यंत तो स्वतंत्र होता. इ. स. १८२५ त ब्रह्मी लोकांचा पराभव करून इंग्रजांनी हा प्रांत आपले ताब्यात घेतला. .