________________
होत होता. त्याची पश्चिमेकडील हद्द रंगपूर जिल्ह्यापावेतों होती. इ० स० ३६० किंवा ३७० सालांत समुद्रगुप्ताने अलाहाबाद येथील स्तंभावर कामरूप देश गुप्त साम्राज्याचे सरहद्दीवर असून गुप्त राजांना खंडणी देत असल्याचे लिहिले आहे. त्यापूर्वीचा या प्रांताचा कांहीं इतिहास उपलब्ध नाही. यानंतर पुढे हि-उएनत्संग इ० स० ६४३ त नालंद मठांत राहात होता. तेव्हां त्याला कामरूपचे राजाने आपल्या भेटीस यावयास लाविले, असा त्या प्रवाशाच्या लेखांत मजकूर आहे. काही दिवस तेथे राहिल्यानंतर कनोजचा राजा हर्षशिलादित्य यानें कामरूपचे राजास त्या प्रवाशास कनोजला पाठविण्याबद्दल लिहिले, परंतु कामरूपचे राजाने उत्तर पाठविले की, शक्य असेल तर हर्षाने त्याचे डोके कापून न्यावें, परंतु सदर चिनी प्रवाशास मी पाठविणार नाही. परंतु शेवटी हर्ष राजाने सक्तीचा हुकूम पाठविला तेव्हां कामरूपचा राजा हिउएनत्संग यास बरोबर घेऊन हर्ष राजाचे भेटीस आला. कामरूपच्या या राजाचे नांव भास्करवर्मा ऊर्फ कुमार असे होते. तो मूळचा कूच असावा. हि-उएन-त्संग याने त्याला जरी ब्राह्मण म्हटले आहे तरी तो क्षत्रिय असावा असे त्याचे नांवावरून वाटते. या प्रांतांत बौद्ध धर्माचा प्रवेश कधीही झाला नाही. पुढे बंगालचे पाल राजांचे राज्यांत हा प्रांत मोडूं लागला. बारावे शतकांत कुमारपाल राजाने वैद्यदेव नांवाचा आपला प्रतिनिधि या प्रांतावर नेमला होता. इ० स० १२२८ सांत शान लोकांपैकी आहोम टोळीचे हल्ले या प्रांतावर सुरू झाले. क्रमाक्रमाने ते या प्रांताचे मालक झाले. व त्यांनी जो वंश स्थापन केला, तो इ० स० १८२५ त इंग्रजांचे ताब्यांत तो प्रांत येईपर्यंत टिकला.. या प्रांताचे महत्त्व मुख्यत्वेकरून आहे तें चीन प्रांतांतून मंगो