________________
वर आपले वर्चस्व बसविले होते. पुढे अंशुवर्मा राजाने तेथे ठाकुरवंश स्थापित केला. अंशुवर्मा इ० स० ६४२ त मरण पावला. आठवे शतकाचे आरंभी नेपाळ देश तिबेटच्या कह्यांत होता. इ० स० ८७९ साली नेपाळचा स्वतंत्र शक सुरू झाला. यावरून तिबेटचे वर्चस्व तेव्हां नष्ट झाले असावें. नेपाळ प्रांत कधींहि मुसलमानांचे ताब्यात गेला नाही. गरखे लोकांनी तो इ० स० १७६८ सालीं जिंकला. ते लोक राजपुतान्यांतून आले होते. ते हिंदु होते. त्यांचेपूर्वी मल्लवंशाचे रजपूत राजे १३ वे शतकापासून राज्य करीत होते. त्यांचेपूर्वी अयोध्येहून आलेले हरसिंहदेव याचे वंशाच्या राजांनी इ० स० १३२४ पासून राज्य केले. अशोकाने नेपाळांत बौद्ध धर्म सुरू केला. त्याच्या मुलीने राजधानीजवळ जी मंदिरे वगैरे बांधली ती अद्याप दाखविण्यांत येतात. सातव्या शतकांत महायान पंथाचे प्राबल्य झाले व शेवटी हिंदुस्थानांतून ज्याप्रमाणे व ज्या कारणांनी बौद्ध धर्माचे उच्चाटन झाले त्याप्रमाणे व त्याच कारणांनी नेपाळांतही तो धर्म बहुतेक नामशेष झाला. कामरूप ऊर्फ आसाम. सांप्रतच्या आसाम प्रांतापेक्षां कामरूप देश जरा विस्तृत होता. कारण त्यांत कुचबिहार संस्थान व रंगपूर जिल्हा यांचा समावेश