Jump to content

पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/132

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तयार करण्याचा धंदा सुरू केला. तेथून ती युक्ति युरोपांत गेली. त्यापूर्वी युरोपांत कागद तयार करण्याचे माहीत नव्हते. युरोपांतील कागदांनी जगावर काय परिणाम गाजविला आहे हे लिहिण्याचे कारण नाही. या वेळेपासून हिंदुस्थान व चीन यांचे दरम्यान राजकीय दळणवळण जें बंद पडले, ते इंग्रज लोकांनी १८८५ साली उत्तर ब्रह्मदेश काबीज करीपर्यंत पुनः सुरू झाले नाही. इ० स० ७४३-७८९ मध्ये बौद्ध धर्माचा प्रसार तिबेटांत जोराने झाला. शांतरक्षित व पद्मसंभव नांवांचे दोन साधु हिंदुस्थानांतून चीनचे बादशहाने नेले. त्यांच्या मदतीने जी धर्मव्यवस्था सुरू केली ती अद्याप लामा पद्धतीने चालू आहे. इ० स० १७५१ सालीं चीनचा अंमल तिबेटावर पूर्णपणे बसला. ___२. नेपाळ. ___ अशोकाचे कारकीर्दीत मौर्यांचा नेपाळ प्रांतावर प्रत्यक्ष अंमल होता. त्या प्रांतांतील पाटण शहरांत अशोक राजा व त्याची मुलगी यांनी ज्या इमारती बांधल्या होत्या, त्यांतील काही विद्यमान आहेत, त्यांवरून या गोष्टीस बळकटी येते. चौथे शतकांत समुद्रगुप्ताचे वेळेस तो प्रांत गुप्तांचे मांडलिक संस्थानांपैकी एक होता, असे प्रयाग येथे असलेल्या समुद्रगुप्ताचे स्तंभावरील लेखांत लिहिले आहे. नंतर तो प्रांत स्वतंत्र झाला. हर्ष राजाने त्या प्रांता. कपटिकचा account of Nepal व राइटची History of Nepal व इतर ग्रंथांचे आधाराने रा. जगन्नाथ रघुनाथ अजगांवकर यांनी ऐतिहासिक, पुस्तकमाला नंबर १८ चे पुस्तकांत बरीच माहिती दिली आहे.