Jump to content

पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/127

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

की, पुंडूक, द्रवीड, यवन, शक व पल्हव या जाती मूळच्या क्षत्रिय कुळांतील होत्या; परंतु त्या ब्राह्मणांस मानीतनाशा झाल्या, व वैदिक धर्मक्रिया त्यांनी सोडून दिल्या कारणाने त्या जातींतील लोक शूद्र झाले. या जातींतील राजांनी व लोकांनी ब्राह्मणांचा अनादर केल्याचे यावरून उघड दिसते व सदई स्मृतींतील तसेंच महाभारतांतल्या अनुशासन पर्वातील त्याच अर्थाचे श्लोक या लोकांची सत्ता नष्ट झाल्यानंतर व ब्राह्मणांचे वर्चस्व सुरू झाल्यानंतर लिहिले असावेत. वायु, लिंग, मार्कंडेय व विष्णु या पुराणांना सांप्रतचें रूप त्याच वेळेस आले असावें. ज्योतिष शास्त्राचे पंचसिद्धांत, रोमक व पौलिश नांवाचे ग्रंथाचा हाच काळ होय. आर्यभट्टाचा जन्म इ० स० ४७६ त झाला. वराहमिहिराचा मृत्य इ.सः ५८७ त झाला. शबरस्वामींनी आपलं मीमांसाभाष्य बहधा इ०स०चे पांचवे शतकांत लिहिले असावे. वार्तिककार कुमारिल भट्ट सातव्या शतकांत होते. वार्तिकतात्पर्य टीकेचा कर्ता वाचस्पति याने उद्योग ग्रंथाचा कर्ता भारद्वाज याचा उल्लेख केला आहे. भारद्वाजाचा काल सहाव्या शतकाच्या मध्याच्या सुमारास असावा. शंकराचार्यांचे व त्यांचे शिष्य सुरेश्वर यांचे ग्रंथ यानंतर झाले. संकृत पुराणांप्रमाणे पाली भाषेत दीपवंश व महावंश नांवांचे ग्रंथ आहेत. दीपवंश इ०स०चे चवथे शतकांतील आहे, व महावंश सहावे शतकांतील आहे. दोन्ही ग्रंथांचा हेतु बौद्ध धर्माचा प्राचीन काळापासूनचा इतिहास लिहिण्याचा आहे. जैन धर्माचा स्थापनकर्ता वर्धमान ज्ञानपुत्र हा होय. त्याला जिन अथवा महावीरही म्हणतात. तो ज्ञात नांवाचे क्षत्रिय कळांतला असून वैशाळांचे राजघराण्यापैकीं होता. ह्या धर्माचा मुख्य हेतु मनुष्यास मुक्ति मिळण्यास मार्ग म्हणजे त्याने तीन रत्नांचा उपयोग करणे हा होय. ती तीन रत्ने म्हणजे सम्यकभक्ति.