Jump to content

पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/128

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सम्यग्ज्ञान व सम्यक्कर्म ही आहेत. या प्रत्येक रत्नांचे पुष्कळ पोट विभाग आहेत. जैन लोकांचा धर्म हिंदुस्थानांत अद्याप पुष्कळ ठिकाणी आहे. या धर्माचे अनुयायी धनाढ्य आहेत. अबू व शत्रुजय पहाडावरील व अमदाबाद, मुंबई, कलकत्ता, वगैरे ठिकाणची त्यांची मंदिरे फार सुरेख व नामांकित आहेत. त्यांचे जती फार विद्वान् असतात. त्या लोकांचे वर्तन निस्पृह व शुद्ध असते. त्यांच्या धर्माच्या लोकांत त्यांचे फार वजन आहे व धर्माचें व विशेषेकरून प्राणिसंरक्षणाचे कामी त्यांची फारच मदत असते. हिंदुस्थानांतील पांजरपोळ संस्थांना जैन लोकांचीच विशेष मदत आहे. भाग १२ वा. उत्तर हिंदुस्थानांतील संस्थाने. इस०६४७-१२०० तिबेट. इ०स० ५५० च्या सुमारास चीनचा हिंदुस्थानच्या पश्चिम प्रांतांवरील अंमल नाहीसा होऊन, एफ्यालिटीज ऊर्फ गौरहण लोकांचा अंमल बसला. त्यांचे राज्यांत काश्गारिआ ( सांप्रतचे काषार ) काश्मिर, आणि गांधार या प्रांतांचा समावेश होत होता. समारे ५६५ साली या गौरहूण लोकांचा अंमल नाहींसा होऊन, तुर्क व इराणी लोकांचा अंमल बसला. पण पुढे एकट्या तुर्काचाच अंमल तेथे राहिला. इ ० स० ६३० मध्ये हि उएनत्संगला कपीस ( काबूल ) पावेतों तुर्क लोकांचे परवान्यानेच प्रवास