Jump to content

पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/126

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

चंद्रगुप्त विक्रमादित्य याचा मृत्यु इ० स० ४११ व ४१४ या सालांचे दरम्यान झाला असल्याकारणाने ते दोघे समकालीन नव्हते. वराहमिहिर इ० स० ५८७ सालांत वारला. राजतरंगिणी ग्रंथांत विक्रमादित्य शकारी विद्वान् लोकांचा आश्रयदाता असल्याचे लिहिले आहे. नवरत्नांपैकी कालिदास हा चंद्रगुप्ताचे वेळेस होता. राजाश्रय नसल्याकारणाने ब्राह्मण धर्माचा जो व्हास होऊ लागला होता, तोच ब्राह्मण धर्म गुप्ताचे साम्राज्यांत पुन्हा उदयास येऊ लागला व तेव्हांपासून ब्राह्मणांचा धर्म व त्यांचे वाङ्मय फार झपाट्याने वाढावयास लागले. आपला धर्म लोकांना ज्यास्त पसंत पडावा व त्याचा पाया शास्त्रीय पद्धतीवर रचावा या हेतूनें ब्राह्मण लोक मोठमोठे ग्रंथ लिहावयास लागले. स्मति, पुराणे व भाष्ये याच कालांत लिहिली गेली. .. पूर्वी आपस्तंब, बौधायन, कठ, आश्वलायन वगैरे शाखांची सूत्रे होती; ती समजण्यास कठीण होती, म्हणून आतां अनुष्टुप छंदाचे श्लोकांत, त्यांच्या स्मृति लिहिण्यांत आल्या. या नव्या ग्रंथांत पूर्वीच्या कांहीं चालींचा निषेध केल्याचे आढळते. उदाहरणार्थ, गोवध यज्ञांत सुद्धा बंद केला; नियोगाची चाल मोडून टाकली; यज्ञाकरितां पशुवध मात्र कायम ठेवला. ह्या पद्यस्मृति कुशान व गुप्त कालांत लिहिल्या गेल्या याचे प्रत्यंतर मनुस्मृतींतील दहावे अध्यायाचे ४३–४४ श्लोकांत दिसून येते. त्यांत असे सांगितले आहे २ कालिदासाने रघुवंशाच्या कुमारादग्विजयांत में हूण लोकांचे पराजयाचे वर्णन केले आहे ते स्कंदगुप्तास लागू पडते. यावरून कालिदास स्कंदगुप्ताच्या वेळी अगर त्याचे नंतर असला पाहिजे. प्रो. पाठक यांचा कालिदासावरील निबंध. ( इंडियन आंटिक्चरी भाग ४१-नोव्हेंबर १९१३.)