________________
राजांकडून अर्थातच ब्राह्मण धर्मास आश्रय मिळाला नाही. यवन, शक व पल्हव राजांकडून आपणांस आश्रय मिळत नाही अशी ब्राह्मणांची तक्रार होती. इ० स० चे तिसरे शतकाचे मध्याचे सुमारास वेमकदफिसीज राजा झाला. त्याचेकडून मात्र ब्राह्मण धमास आश्रय मिळाला. त्याचे नाण्यांवर नंदी व शिव ह्यांच्या मूर्ति आढळतात व तो आपल्यास महेश्वरभक्त असें म्हणवितो. त्याचे पश्चात् जे कुशान राजे झाले, त्यांनी ब्राह्मणांचे देवांस आश्रय दिला खरा, परंतु ग्रीक, झोरोऑस्ट्रियन व बौद्ध यांचे धर्मासही त्यांनी आश्रय दिला. गुप्त राजाचे कारकीर्दीत मात्र केवळ ब्राह्मण धर्मासच उत्तेजन मिळण्यास सुरुवात झाली. समुद्रगुप्त व कुमारगुप्त यांनी अश्वमेधाची पुनः सुरुवात केली. समुद्रगुप्तास कविराज ही पदवी मिळाली. त्याने कवींस उत्तेजन दिले, इतकेंच नव्हे तर स्वतःही त्याने काव्ये लिहिली. विक्रमादित्याबद्दल ज्या आख्यायिका ऐकण्यांत येतात त्या जर कोणा राजास लागू पडण्यासारख्या असतील तर त्या दुसऱ्या चंद्रगुप्तासच लागू पडतात. त्याने माळवा प्रांत काबीज केला, व तेथील शक क्षत्रप यांस हांकून दिले. कुशान लोकांसही त्याने घालवून दिले. त्याने उज्जनी हे आपले राजधानीचें नगर केले, व विक्रमादित्य ही पदवी त्याने धारण केली. सहावे शतकांत विक्रमादित्य राजा झाला असल्याचे कोठे दिसत नाही. विक्रमादित्य शकारीचे वेळेस नवरत्ने असल्याची कल्पना खरी दिसत नाही. वराहमिहिर याने पंच सिद्धांतिका नांवाचा ग्रंथ लिहिला. १ या नवरत्नांची नावे:-धन्वन्तारक्षपणकामरासंहशकुवेतालभट्टघटखपरकालिदासाः । ख्यातो वराहमिहिरो नृपतेः सभायां रत्नानि वै वररुचिर्नव विक्रमस्य ॥ १ ॥ सुभषितरत्नभाण्डागारम् पृ. ३८.