Jump to content

पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/124

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

डब्ल्यू० टी० उइल्किन्स लिहितात की, “बौद्ध धर्माचे अनुयायांचा इतका छळ झाला की, ते सर्व मारले गेले, किंवा त्यांना देशांतून हांकून लावलें, किंवा त्यांना आपला धर्म बदलण्यास भाग पाडले. हिंदुस्थानांतून बौद्धधर्माची उचलबांगडी जुलमामुळे जशी झाली, तसें धर्माच्या छळाचे उदाहरण क्वचितच सांपडेल. " परंतु ह्यांत सत्याचा अंश मुळीच नाही. बौद्ध धर्माचा -हास होण्याची खरी कारणे अशी आहेत की, गौतमबुद्धानें तो धर्म स्थापन केला, तेव्हां त्याचे जे उज्ज्वल नीतिविषयक स्वरूप होतें तें हलके हलके ग्रीक, सिथियन, तातर वगैरे लोकांच्या संगतीमुळे मलिन झाले. या लोकांनी बौद्ध धर्म स्वाकारला खरा, परंतु तो स्वीकारतांना त्यांनी आपल्या रानटी चालाराति पूर्णपणे सोडल्या नाहीत. त्यांच्या संसर्गाने बौद्ध धमात मूर्तिपूजा शिरली व महायान पंथास सुरुवात झाली. आपल्या धर्माचे व आपल्या उपदेशकांचे लोकांवर वजन ज्यास्त पडावें म्हणून त्यांनी संस्कृत भाषेचा अंगीकार केला. त्याचा परिणाम असा झाला की, पूर्वी बौद्ध धर्माचा सामान्य लोकांत जा प्रसार होत होता तो बंद होऊन, ब्राह्मण धोप्रमाणच तो थोडक्या लोकांना समजं लागला. बुद्ध, धर्म, व संघ या तीन शब्दांचा लोकांचे मनावर जो एक विलक्षण परिणाम होत होता तो नाहीसा झाला बौद्ध धर्माचा जसजसा हास होत चालला, तसतसा ब्राह्मण वर्माचा जोर जास्त वाढू लागला. ख्रिस्ती शकापूर्वी सुमारे १०० वर्षे व ख्रिस्ती शकानंतर सुमारे साडेतीनशे वर्षांत कोणीही शक्तिमान असा ब्राह्मगधर्मी राजा झाला नाही. हिंदु स्थानावर परदेशी लोकांचे हल्ले वारंवार येऊ लागले. त्या परदेशी १ हिसडेविसचे बुधिस्ट इंडिया पाने ३१५-३१९.