पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/123

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

संस्कृत ग्रंथ नव्याने निर्माण झाले. याप्रमाणे संस्कृत भाषेचे महत्त्व वाढल्यामुळे, ती अवगत असलेल्या ब्राह्मण विद्वानांचेही महत्त्व सहजच वाढले. अशोकाच्या वेळेपासून कनिष्काच्या वेळेपर्यंत म्हणजे [ इ०स० पूर्वी तिसरे शतकापासून तों इ० स० नंतर दुसरे शतकापर्यंत ] ज्या देणग्या देण्यात आल्या त्यांपैकी तीन चतुर्थीश किंवा ज्यास्त बौद्ध लोकांस किंवा बौद्ध धर्मार्थ दिल्या असल्याचे दिसते; व बाकीच्या एक चतुर्थाशाचा बराच मोठा भाग जैन धर्माकडे दिला गेला. परंतु इ० स० चे दुसरे शतकापासून हे पारडे अगदी बदलं लागले, व तें पांचवे शतकांत इतके बदललें कीं, तीन चतुर्थांश देणग्या ब्राह्मणांना व त्यांचे धर्माला दिल्या आहेत व राहिलेल्या एक चतुर्थाशाचा बराच मोठा भाग जैन धर्माकडे दिल्याचे दिसते. शेवटी ज्या देशांत बौद्ध धर्माचा उदय झाला त्या देशांत बौद्ध धर्माचा अनुयायी क्वचितच आढळण्यांत येतो. हा सर्व प्रकार घडून येण्यास किती काळ लागला हे चिनी प्रवाशांचे लेखांवरून आपणांस समजून येते. इ० स० चे चवथे शतकाचे आरंभी फा--हिआन हा हिंदुस्थानांत आला, तेव्हां बौद्ध धर्म त्यास लयास जात असल्याची चिन्हें चोहीकडे दिसत होती. सातवें शतकांत हि-उएन--त्संग आला तेव्हां बौद्ध धर्माचे सुमारे दोन लक्ष लोक हिंदुस्थानांत होते. त्यांपैकी तीन चतुर्थीश जुन्या मताचे होते व एक चतुर्थांश लोक महायानी पंथाचे होते. __ दुईत्सन व कोलबूक म्हणतात की, बौद्धांचा -हास कुमारिल भट्ट नावाच्या ब्राह्मणाच्या चिथावणीवरून बौद्ध लोकांचा इ० स० च्या आठवे शतकांत जो भयंकर छळ झाला, त्यामुळे झाला. रे० १ हिसडेविस ३१५-३१९..