Jump to content

पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पुरवणी टिपा. -:0: १ हूण लोक-डॉक्टर जीवनजी मोदी यांनी या लोकांची माहिती दिली आहे ती अशी:___ हे लोक चीन देशाच्या उत्तरेस आमूर व इरलिश नद्यांचे दरम्यान प्रथम रहात होते. पुढे त्यांनी तारतरी प्रांत जिंकला. तेथें खि० पु० २०० वर्षे त्यांनी राज्य केले. खिस्ती शकाचे काही पूर्वी व नंतर त्यांचा जगांतील सर्व मोठमोठ्या साम्राज्यांशी संबंध आला. रोमचे राज्य त्यांनी नाहींसे केले. चिनी लोकांनी त्यांना प्रतिबंध करण्याकरतां प्रसिद्ध चिनी भिंत बांधली. तेव्हां ते पश्चिमेकडे वळले. त्यांच्याच चेपीमुळे स्याक्सन लोक इंग्लंड देशांत गेले. त्यांचा इतिहास दोन हजार वर्षांचा आहे. तेवढ्या काळांत त्यांनी इराणांत स्वाऱ्या केल्या व हिंदुस्थानांतील गुप्त साम्राज्य मोडले. त्यांचा शेवटचा राजा मिहिरगुल नांवाचा होता. ____आपले मृतराजे पुरण्याची त्यांची विलक्षण रीत होती. ते कोठे पुरले आहेत हे कळू नये म्हणून कधी कधी ते मोठमोठ्या नद्यांचे प्रवाह फिरवीत व त्या ठिकाणी त्यांना पुरून पुन्हां त्यावर नद्या सोडीत. ज्या लोकांकडून हे काम ते करून घेत त्यांना ते ठार मारीत. फ्रान्स, इटली, जर्मनी व युरोपांतील इतर उत्तरेकडील देश त्यांनी ओसाड केले. खलिफांचे राज्य घेऊन ख्रिस्तांची पवित्र भूमि, पालिस्टाइन, आपले ताब्यात घेतली. याच लोकांना पुढे तुर्क हे नांव प्राप्त झाले. . ( मुंबई क्रानिकल-१९१६ आगष्ट ३०.) २-आर्य लोकांविषयी काश्मीरचे प्रोफेसर जगदीश छतर्जी यांची अगदी नवी कल्पनाः (१) हिंदुस्थानांत येण्यापूर्वी आर्य लोक व व्याबिलोन, ईजिप्त, ईजियन, हिब्रू या लोकांचे पूर्वज एका ठिकाणी रहात होते. तेथेंच चीन लोकांचे पूर्वजही राहत असत. ते ठिकाण म्हणजे पाँटस व आमिनिआ प्रांताजवळ होते.