________________
[ २ ] (२) वेदांतील व इतर प्राचीन संस्कृत ग्रंथांतील नांवें वास्तविक यापूर्वीच्या प्रांतांतील स्थळांची आहेत. (३) भरतखंडांत आर्य लोक वेदानंतर फार काळानंतर आले इतकेंच नव्हे, तर महाभारत युद्धानंतर आले. रामायणांतील व महाभारतांतील गोष्टी हिंदुस्थानच्या बाहेर आर्यांच्या पूर्व ठिकाणी घडल्या. हस्तिनापूर, इंद्रप्रस्थ, अयोध्या वगैरे स्थळे हिंदुस्थानांतील नव्हेत; आर्याच्या पूर्वीच्या वसति-स्थानांतील आहेत. महाभारतांतील गोष्टी व स्थळे जावा व वाली बेटांत आहेत हे जसे त्या बेटांतील लोकांचे म्हणणे आहे त्या प्रकारचेच म्हणणे हिंदुस्थानांतील लोकांचे आहे. परंतु ते खरे नाही, (४) आर्य लोक हिंदुस्थानांत बुद्धाच्या काळापूर्वी फार दिवस आले नाहीत व म्हणूनच बुद्धाच्या पूर्वीच्या फारशा प्राचीन खुणा हिंदुस्थानांत सांपडत नाहीत. (५) कुरु व हियइट लोक एकच आहेत, व त्यांचे मूळ वसातस्थान पाँटसजवळ होते. (टाइम्स ऑफ इंडिया, ११ एप्रिल सन १९१६.) ३ डाक्तर स्पूनरची हिंदुस्थानांत इराणचे राज्य असल्याबद्दलची विलक्षण कल्पनाः सर दोराब टाटा या धनाढ्य पारशी गृहस्थाच्या मदतीने डॉक्टर स्पूनर नांवाच्या विद्वान् प्राचीनवस्तुसंशोधकाने पाटणा (पाटलीपुत्र) यथ काहा खणण्याचे कामास आरंभ केला व त्यांना जमिनींत जे काही दिसून आले त्यावरून त्यांनी असा तर्क काढला की, तेथें पूर्वी एक मोठा राजवाडा होता, तो इराणांतील दरायसच्या राजवाड्यासारखा होता; यावरून पाटलीपुत्राचा राजा चंद्रगुप्त हा हिंदू नसून पारशा हाता; चाण क्यहा पारशी होता; अर्थात् अशोकही पारशचि झाला. मौर्य हा मर्व शब्दाचा अपभ्रंश आहे; मयासूर म्हणजे आहूरमझ्द. परतु या निवळ कल्पना आहेत. याला आधार म्हणून मुळीच नाही हे प्रोफेसर जयस्वाल यांनी स्पष्टपणे सिद्ध करून दाखविले आहे. ४ डॉक्टर मोल्टन यांचे म्हणणे आर्य लोकांची मूळ वस्ती डान्यूब नदीच्या उत्तरेस होती.