पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[ २ ] जगद्धितेच्छु छापखान्याच्या चालकांना इतर महत्त्वाची कामें नसती तर हे पुस्तक मागेंच प्रसिद्ध करतां आलें असते कारण तें बहुतेक तयार होऊन एक वर्षावर दिवस होऊन गेले आहेत. त्यांनी आपल्या वहिवाटीप्रमाणे काम चांगले केले आहे हे वाचकांच्या दृष्टीस येईलच. रा. सहस्रबुद्धे यांना अपरिहार्य अडचणीमुळे नकाशे व चित्रे तयार करण्यास वेळ लागला तथापि त्यांनी काम मनापासून केले याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. पुस्तकाचे छपाईत बऱ्याच चुका राहिल्या आहेत. त्या छापखानेवाल्यांच्या निष्काळजपिणामुळे झाल्या म्हणण्यापेक्षां तपासण्यात जितकी काळजी घ्यावयास पाहिजे होती तितकी न घेतल्यामुळे झाल्या हे म्हणणे बरें. त्यामुळे शुद्धिपत्र फार विस्तुत झाले आहे. वाचकांनी ग्रंथ वाचण्यास आरंभ करण्यापूर्वी शुद्धिपत्राप्रमाणे दुरुस्ती करावी अशी त्यास सविनय विनंती करणे भाग आहे. मनोहर विष्णु काथवटे.