________________
वेळी ते सामा गृहीत झाले. पत्काळी पुढे र संवादाचे तात्पर्य हे होते की, जो सत्कर्म करतो तो पुण्यवान् होय. जो दुष्कर्म करतो तो पापी होय. या उत्तराने आतभागाच्या शंकेचे निरसन झालें, व तो स्तब्ध राहिला. या संवादावरून तीन गोष्टी निघतात त्या ह्याः-१ आत्मा हा पदार्थ मनुष्याच्या घटकावयापासून भिन्न नाहीं. २ पुनर्जन्म हा कर्मामुळे होतो; : कर्म चांगले वाईट असेल त्याप्रमाणे पुढील जन्म पवित्र अगर पापी होतो. या सिद्धांतांपैकी तिसरा सिद्धांत सर्व दर्शनांत आहे. परंतु पहिले दोन सिद्धांत उपनिषत्काळी पुढे येऊ लागले होते, व ते बौद्ध मतांत गृहीत झाले. याज्ञवल्क्य व आर्तभाग यांचे संवादाचे वेळी ते सामान्य विद्वानांना चमत्कारिक वाटत होते, व म्हणून तो संवाद एका बाजूस व्हावा हे याज्ञवल्क्य ऋषीस इष्ट वाटले. शाकल राजा मिलिंद ऊर्फ मेनडर व बौद्ध साधु नागसेन यांचा संवाद आहे तो असाः राजाः—आपल्यास कसे ओळखतात ? आपले नांव काय ? __नागसेनः-माझे वडील, उपाध्ये वगैरे मला नागसेन म्हणतात, परंतु नागसेन ही कांहीं वेगळी वस्तु नाही. या गोष्टीची पुरी समजूत घालून देण्याकरितां नागसेनाने रथाचा दाखला दिला. रथाचे वेगवेगळे भाग एकत्र केले म्हणजे जसा रथ हाता तसे पांच स्कंध एकत्र झाले म्हणजे मनुष्य होतो. हे पांच स्कष म्हणजे रूप, विज्ञान, वेदना, संज्ञा व संस्कार असे होत. ज्याप्रमाणे रथ ही जिन्नस त्याचे घटकावयावांचे एकीकरणाशिवाय वेगळी नाही, तसेंच मनुष्यप्राणी हा त्याचे घटकावयवांशिवाय कांहीं वेगळा नाही. राजा पढें विचारतोः राजाः- नागसेन, पुनर्जन्म होतो तो कशाचा ? नागसेनः-नाम-रूप यांचा पुनर्जन्म होतो. राजाः-म्हणजे काय, हें नामरूपच पुन्हा जन्मास येते काय