पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/117

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उपाय म्हणजे सम्यक्दृष्टि सम्यक्संकल्प, सम्यक्वाक्, सम्यकर्म, सम्यगाजीव, सम्यग्व्यायाम, सम्यक्स्मृति व सम्यक्समाधि हे होत. वासना नाहीशी झाली असतां निरंतरचे सुख प्राप्त होते. आत्म्याचे अस्तित्व जे मानितात त्यांना निरंतरचे सुख म्हणजे आत्म्याचा मोक्ष हे होय. परंतु बौद्ध मतास आत्मा मान्य नसल्यामुळे, त्यांचे निरंतरचे सुख म्हणजे निर्वाण होय. बृहदारण्यकोपनिषदांत एक मंत्र आहे. ( अ. ३ मधील ब्राह्मण २ मंत्र १३) त्यांत सुद्धां आत्म्याच्या स्वतंत्र अस्तित्वाबद्दल शंका ध्वनित केली आहे. याज्ञवल्क्य ऋषि व जरत्कारूचा मुलगा आर्तभाग यांचा संवाद तेथे दिला आहे तो असा:—हे याज्ञवल्क्य, पुरुषाचे मरणानंतर त्याची वाचाशक्ति अग्नीकडे जाते, त्याचा श्वास वायूस जाऊन मिळतो, त्याची दृष्टि सूर्यास, त्याचे मन चंद्रास, त्याची श्रवण शक्ति दिशांस, देह पृथ्वीस, आत्मा आकाशास, शरिरावरील रोम वनस्पतीस, शिरावरील रोम वृक्षास, रक्त व शुक्र पाण्यास मिळून जातात, तेव्हां पुरुषाचे काय होते ?" याज्ञवल्क्य म्हणतात, ' आतभाग, चल, माझा हात धर; तूं व मीच फक्त या गोष्टीसंबंधाने बोलूं. येथे बसलेल्या मंडळींना हा संवाद कळणे योग्य नाही. ' असे म्हणून ते दोघे निघून गेले. त्यांच्या १ याज्ञवल्क्य हो वाच- यत्रास्य पुरुषस्य मृतस्यानिं वागप्येति वातं प्राणश्चक्षुरादित्यं मनश्चंद्र दिशः श्रोत्रं पृथिवी शरीरमाकाशमात्मौषधीर्लोमानि वनस्पतीन्केशा, अप्स लोहितं च रेतश्च निधीयते क्वायं तदा पुरुषो भवतीत्याह रसोन्य हस्तमार्तभागाऽऽवामेवैतस्य वेदिष्यावो न नावेतत्सजन इति । तो होत्क्रम्य मन्त्रयांचक्राते तो ह यदूचतुः कर्म हैव तदूचतुरथ यत्प्रशश - सतुः कर्म हैव तत्त्वशश ५ सतु पुण्यो वै पुण्येन कर्मणा भवति पापः पापेनेति ततो ह जारत्कारव आर्तभाग उपरराम ॥ १३ ॥