पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/113

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नेपाळांतून वैशाली व बुद्धगया येथे आला, आणि काबूल, उत्तर अफगाणिस्थान, हिंदुकुश व पामीर या रस्त्याने परत गेला. ___ हि-उएन-त्संग याने वेगळ्या वेगळ्या प्रांतांची माहिती दिली आहे. तिजवरून असे समजते की, त्या वेळेस उत्तरेस काश्मिरचें राज्य प्रबल होते; आणि तक्षशिला, सिंहपूर व इतर लहान लहान संस्थाने काश्मिरची मांडलिक होती. पंजाबांत सेहकिआ नांवाचें राज्य होते. सिंधप्रांतांत एक शूद्र राजा होता. त्या वेळेस त्या राज्यांत दहा हजार बौद्ध भिक्षु होते; परंतु ते आळशी, व्यसनी व अनीति. मान् होते. त्या राजाचें नांव सिंहरस राई असे होते. त्याचे कार_ कीर्दीत आरब लोकांनी त्याजवर स्वारी केली, व त्याचा पराभव करून त्यास ठार मारले. त्याचा मुलगा साहसी याचीही तीच दशा झाली. ( इ० स० ६४६ ). त्याचे पश्चात् चच नांवाच्या ब्राह्मण प्रधानाकडे राज्य गेले. त्याने ४० वर्षे राज्य केलें. इ०स० ७१०-७११ चे सुमारास आरब लोकांनी पुन्हां स्वारी करून चचचा मुलगा दाहीर यास ठार मारले. (इ०स०७१२) तेव्हांपासून सिंधप्रांत कायमचा मुसलमानांचे ताब्यात गेला. मध्य हिंदुस्थानांत उज्जनीचे ब्राह्मण जातीचे राजे होते: कामरूपच्या कुमार राजानंतर भास्करवर्मा नांवाचा ब्राह्मण राजा होता. कलिंग देशांत कोणी राजा नव्हता. हर्षवर्धन हा हिंदम्थानांतील देशी राज पैकी शेवटचा सार्वभौम राजा होता. त्याचे मरणानंतर पांचशे वर्षेपावेतों हिंदुस्थानांत देशी अगर परदेशी कोणीच प्रबळ राजा राहिला नाहीं; जिकडे तिकडे लहान लहान संस्थाने झाली. आजपावतो आर्य लोकांची सर्व दिशेने जी प्रगाते होत चालली होती, ती आतां बंद पडली, असें मि० विन्सेंट स्मिथ यांचे म्हणणे आहे. परंतु इ० स०चे पांचवे शतकापासून तों