Jump to content

पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/112

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ग्रंथांची चिनी भाषेत भाषांतरें केली. नंतर तो इ०स०६६४ मध्ये मरण पावला. हर्ष राजाने चीनच्या बादशाहाकडे एक ब्राह्मण वकील पाठविला होता. तो ६ ४ ३साली चीनच्या बादशाहाचे उत्तर घेऊन परत आला. त्याचे बरोबर चिनी वकीलही आले होते. ते ६४५ सालापर्यंत हिंदुस्थानांत राहिले. पुढचे साली चीनचे बादशाहानें तीस घोडेस्वार बरोबर देऊन वंग-हि उएन-त्से नांवाचा दुसरा वकील हर्ष राजाकडे पाठविला. परंतु तो वकील मगध देशांत येण्याचे पूर्वीच हर्ष राजा ६४६ किंवा ६४७ त मरण पावला. __त्याचे मरणानंतर त्याचा प्रधान अर्जन यानें गादी बळकाविली. त्याने चिनी वकिलाचा अपमान केला, त्याची मालमिळकत लुटली, व त्याच्या स्वारीतील बरेच लोक ठार केले. परंतु खुद्द वकील व त्याचे जोडीदार हे रात्री पळून गेल्यामळे वांचले. ___ त्यांना तिबेटच्या राजाने आश्रय दिला, व एक हजार स्वारांची फौज त्यांचे बरोबर दिली. नेपाळांतूनही त्यांना सात हजार लोक मिळाले. या फौजेनिशीं वंग-हि-उएन-त्से हा परत आला, व तिरहूत शहर त्याने घेतले. त्या वेळेस तेथील शिपायांपैकी तीन हजार लोक त्याने ठार केले व दहा हजार लोक जवळच्या नदीत बुडून मेले. अर्जुन तेथून पळाला व नवी फौज गोळा करून लढाईस उभा राहिला. परंतु त्याचा पन्हां पराभव झाला व स्वतः ता पकडला गेला. वकिलाने अर्जन राजाच्या कटंबांतील सर्व माणसें पकडली. शिवाय बारा हजार लोक कैद केले, आणि तास हजार गुरें घेतली. अर्जुनास तो चिनांत घेऊन गेला. ___वंग-हि-उएन-त्से हा आपले यजमानाच्या हुकुमावरून ६५७ साली पुन्हा हिंदुस्थानांत आला. परंतु या खेपेस बौद्ध धर्माच्या पवित्र मंदिरास देणग्या देण्याकरितां मात्र तो आला होता. तो