________________
चौदावे शतकापावेतों चालुक्य व राष्ट्रकूट वंशांची राज्ये, तसेंच दक्षिण हिंदुस्थानांत नववे शतकापासून चौदावे शतकापावेतों चोल साम्राज्य, बंगाल्यांत आठवे शतकापासून बारावे शतकापावेतों पाल राजांचे राज्य, याप्रमाणे मोठमोठी राज्ये झाला. या गोष्टी ध्यानात ठेवल्या तर या म्हणण्याचे महत्त्व बरेंच कमी होते. भाग ११ वा. हिंदुस्थानांत बोद्ध धर्माचा उदय, प्रसार व हास. हिंदुस्थानांत आर्य लोकांनी आपला धर्म स्थापन केला, त्यात यज्ञयागाचे महत्त्व जरी बरेच वाढले तरी आध्यात्मिक विचारांचा धर्म त्यामुळे नाहीसा झाला असें नाहीं, व शेवटी त्या तत्त्वाची पूर्ण वाढ उपनिषत् काळांत झाली. ऋग्वेद संहितेत दहावे मंडळात १२९ सावे मंत्रांत म्हटले आहे की, विश्वांत आरंभी सर्व अंधार होता; परंतु त्यांत एक शक्ति होती, तिच्या योगाने कामना ( वासना ) उत्पन्न झाली. ती शक्ति म्हणजे मन किंवा विचार शक्तीचे बीज. बौद्ध धर्माचे मळ या तत्त्वांत आहे. बौद्ध धर्माताल चार मुख्य सिद्धांतांपैकी पहिला सिद्धांत हा आहे की, जगात । दःख आहे. दसरा सिद्धांत असा आहे की, या दुःखाच कार" वासना हे आहे. तिसरा सिद्धांत असा आहे की, दुःख नाहीस ण्यास उपाय वासना नाहींशी करणे हाच आहे. वासना नाहीशा करण्यास उपाय आठ आहेत, हा चवथा सिद्धांत होय. हे आ० १ डॉ. भांडारकरांच्या " A peep into the Early Histor: of Indin " नामक निबंधाच्या आधाराने मुख्यत्वकॅरून हा भाग । हिला आहे.