पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/111

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

यानंतर दवानगी मिळाली माल वस्तु ग्याउबदार कफनी केला. देवाच्या व शिवाच्या मिरवणुकी काढल्या होत्या, व ब्राह्मण व जैन यांनाही पुष्कळ देणग्या देण्यात आल्या आणि एक महिनाभर आंधळे, पांगळे, अनाथ व गरीब लोक यांना धर्मादाय करण्यांत आला. ___ या देणग्यांमुळे व धर्मादायांमुळे, राजाच्या खजिन्यांतील सर्व शिल्लक संपली. त्याची स्वतःची अलंकारभूषणेही नाहीशी झाली. व शेवटी त्याने आपली बहीण राजश्री इच्याकडून एक जना पोषाख मागून घेतला व तो घालून त्याने बुद्धाची पूजा केली. आपली सर्व संपत्ति धर्मादायांत खर्च झाली हे पाहून त्याला फार आनंद झाला. ____ यानंतर दहा दिवसांनी हि-उएन-त्संग यास आपल्या देशी जाण्याची परवानगी मिळाली. जाण्याचे वेळी हर्ष राजा व कुमार राजा यांनी त्यास काही बहुमोल वस्तु घेण्याचा आग्रह केला. परंतु त्याने कुमार राजाची एक बिनबाह्यांची उबदार कफनी मात्र घेतली. त्याचे प्रवासाचा बंदोबस्त राजाने सढळ हाताने केला. त्याच्याबरोबर काही घोडेस्वार दिले व त्याच्यावर उधीत नांवाच्या राजाची नेमणूक केली. खर्चाकरतां तीन हजार सोन्याची नाणी व दहा हजार चांदीची नाणी हत्तीवर घालून दिली. हि-उएनत्संग सहा महिन्यांनी पंजाबांतील जालंदर शहरास जाऊन पोचला. तेथें एक महिनाभर राहून मोठमोठाले व कठीण पर्वत चढून पामीरचे रस्त्याने ६४६ चे उन्हाळ्यांत चीन देशांत आपले घरी जाऊन पोंचला. त्याने आपल्या बरोबर ६५७ पोथ्या व सोन्याचांदीच्या व चंदनाच्या बुद्धाच्या पुष्कळ मूर्ति व बुद्धाच्या स्मारक म्हणून ३५० जिनसा आणल्या. याप्रमाणे त्याने सामानाने भरलेली वीस घोडी आपले बरोबर हिंदुस्थानांतून आणली. त्याने एकंदर चौऱ्याहत्तर