________________
राजानें व आणखी दुसऱ्या अठरा मांडलिक राजांनी व चार हजार बौद्ध भिक्षूनी हर्ष राजाचे स्वागत केले. ___ या समारंभांत मुख्य पाहण्याचे ठिकाण म्हणजे एक भव्य मठ होता. त्या मठांत राजाचे आकृतीएवढी बुद्धाची सुवर्णमूर्ति स्थापन केली होती. त्याशिवाय दुसरी एक दीड हात उंचीची सोन्याची भोगमूर्ति तयार केली होती. दररोज या मूर्तीची मिरवणूक निघत असे. त्या वेळेस ती मूर्ति हर्ष राजा स्वतः आपल्या डोक्यावर घेऊन जात असे. कामरूपचा राजा त्या मूर्तीवर चौरी, मोर्चेल धरीत असे. बाकीचे वीस राजे व तीनशे हत्ती मार्गे चालत असत. वाटेने राजाच्या दोन्ही बाजूस त्याचे सेवक त्याचे आज्ञेनें मोती व सोन्याची फुले व इतर मौल्यवान जिनसा उधळीत होते. मूर्ति पूजास्थानी ठेवल्यावर हजारों मौल्यवान वस्त्रे तो देवास अर्पण करीत असे. नंतर मोठा भोजनसारंभ होई. याप्रमाणे कित्येक दिवस ही परिषद चालू राहिली. व वर सांगितल्याप्रमाणे वाद करण्यास दुसऱ्या बाजूने कोणीही विद्वान आला नाही. हि-उएनत्संग याचे मात्र एकतर्फी भाषण होत असे. एके दिवशी या मठाला एकदम आग लागली. परंतु राजा स्वतः येण्याबरोबर ती आग विझून गेली. एके दिवशी हर्ष राजा स्तूपावरून खाली उतरत असताना एक मनुष्य हातांत जंबिया घेऊन त्याच्यावर चाल न आला. भोवतालच्या मनुप्यांनी त्यास पकडले. तेव्हां त्याने सांगितले की, जैन व ब्राह्मण लोकांनी हे कृत्य करावयास मला सांगितले. त्यावरून पुष्कळः ब्राह्मणांना पकडले व मुख्य मुख्य पुढाऱ्यांचा शिरच्छेद केला व पांचशे ब्राह्मणांना हद्दपार केल, ___यानंतर हर्ष राजाने हि-उएन-त्संगाचे सन्मानार्थ प्रयाग यथ दुसरी परिषद भरविली. ती पंचाहत्तर दिवस चालली. त्या वेळस कनाजप्रमाणेच सर्व समारंभ झाला. परंत दसरेच दिवशी सूये