________________
___ ७९ करावी अशी त्याची इच्छा होती. पहिल्या परिषदेच्या वेळेस त्याला अशी खबर लागली की, हि-उएन-त्संग याच्या प्रतिस्पर्ध्याचा त्याचा प्राण घेण्याचा विचार आहे. त्यावरून त्याने असा जाहिरनामा काढला की, “ या धर्म गुरूच्या केसास जर कोणी धक्का लावील तर त्याचे शीर उडविले जाईल; त्याच्या विरुद्ध कोणी भाषण करील तर त्याची जीभ छाटली जाईल; परंतु जे कोणी त्याचा उपदेश ऐकावयास येतील त्यांना कोणच्याही त-हेची भीति नाही असे आम्ही फरमावितों. " अर्थात् हा जाहिरनामा लागल्यावर वादास कोण येणार ? वादाची मुदत १८ दिवसांची होती. ती संपेपर्यंत वादास कोणीही आले नाही. . या परिषदेकरितां तो गंगा नदीच्या दक्षिण तीरानें कनोज शहरी जाण्यास निघाला. त्याने आपल्या बरोबर कामरूप (आसाम) चा राजा कुमार यास घेतले. कुमार राजा गंगेच्या तीराने निघाला. दोन्ही राजांबरोबर फौजफाटा व तमासगीर मंडळी मिळून मोठा समुदाय होता. राजधानीत आल्यावर कुमार राजानें, वल्लभीच्या ___ १ मि. व्हिन्सेंट स्मिथ यांनी दुसरे आवृत्तींत खाली लिहिलेली गोष्ट चुकीनें हर्षवर्धनाची म्हणून लिहिली होती. ती हकीकत वास्तविक राजपुतान्यांतील एका श्रीहर्ष नांवाच्या राजाबद्दलची आहे. ____ तारानाथ नांवाच्या तिबेटी इतिहासकाराने एक चमत्कारिक गोष्ट लिहिली आहे ती अशी:-परधर्मी उपदेशकांकरितां मुलतान शहराजवळ त्याने एक मोठा मठ बांधला. त्या मठांत असे हजारों परधर्मी उपदेशक येऊन राहिले. राजाने कित्येक महिनेपर्यंत त्यांची उत्तम बरदास्त ठेविली. एके दिवशी त्याने त्या मठाला आग लावून दिली. त्या होम कुंडांत बारा हजार परधर्मी लोक व त्यांची पुस्तकें जळून भस्म झाली. या कृत्त्यामुळे इराणी व शक धर्माने शंभर वर्षे डोके वर काढले नाही. या धर्माच्या लोकांपैकी खुरासान प्रांतांतील एक कोष्टी मात्र जिवंत राहिला होता.