Jump to content

पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/108

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

राज्याच्या शेवटी शेवटी बौद्ध धर्माच्या लोकांसच त्याच्याकडून विशेष उत्तेजन मिळाले. त्याने पुष्कळ मठ व हजारों - प बांधिले. हे सर्व लाकडाचे व कळकाचे असले कारणाने लवकरच पडून गेले. बौद्ध धर्म या वेळेस जरी खालावण्यास लागला होता, तरी मठांत राहणाऱ्या भिक्षंची एकंदर संख्या सुमारे दोन लक्ष होती. - ह्या काळांत हिंदु स्त्रियांना मुसलमानांच्या प्रमाणे पडदा नसून . मोकळेपणाने हिंडण्याफिरण्याचे किती स्वातंत्र्य होते, याचे एक उदाहरण पहावयास सांपडते. हर्ष राजाची विधवा बहीण त्याचे बरोबर त्याच्या प्रसिद्ध चिनी धर्मगुरूची व्याख्याने ऐकावयास बसत असे. प्रत्यक्ष राज्यकारभारांतही तो आपल्या बहिणीची मदत घेत असे. खुद्द हर्ष राजाचे कुटुंबांतील काही माणसें शिवभक्त होती, कांहीं सूर्योपासक होती, व कांही बौद्ध धर्माची होती. एकंदर लोकसमाजांतही याचप्रमाणे स्थिति होती. परंतु पौराणिक देवतांकडे लोकांचा कल जास्त होऊ लागला होता; तथापि एकमेकांसबधान तीव्र द्वेष व मत्सर बिलकूल नव्हता. मात्र कधी कधी धर्मद्वेषमूलक गुन्हे घडत असत. हषे राजा हि-उएन-त्संग याचे संभाषणाने इतका खूष झाला की, त्याने आपली राजधानी कनोज येथे मोठी परिषद भरवून त्या विद्वान उपदेशकाच्या उपदेशाचा फायदा सर्व लोकांना करून याचा बत केला. दुसरी परिषद त्याने प्रयाग येथे भरविली. या पारषदात वेगवेगळ्या धर्माच्या आचार्यानी धर्मसंबंधी चर्चा १ मध्य बंगालचा राजा शशांक याने बुद्धगया येथील बोधि वृक्ष खणून जाळून टाकला. पाटलिपुत्र शहरांतील बुद्धाच्या पाषाणाच्या पादुका फोडून टाकिल्या; मठाचा नाश केला व यतींना हाकून दिले. याप्रमाणे हि-उएन-संग याने लिहिले आहे. पुढे काही दिवसांनी मगध देशचा राजा पूर्णवर्मा याने बोधिवृक्ष पुन्हां लाविला.