________________
७७ तेव्हांपासून त्याचे लक्ष धर्माकडे व परलोकसाधनाकडे लागण्यास आरंभ झाला. अशोक राजाप्रमाणे आचरण ठेवावें असें त्याला वाटू लागलेसें दिसते. प्रथम बौद्ध धर्मातील हीनयान सांप्रदायाकडे त्याचे मन वळले. त्यानंतर महायान सांप्रदाय त्याला पसंत वाटू लागला. तो साधु बनला आणि प्राणहिंसा बंद करण्याकरितां तो फार सक्तीचे उपाय योजू लागला. धर्मसंस्थापनेत त्याचे मन इतकें गढून गेलें कीं, तो निद्रा व भोजन सुद्धा कधी कधी विसरत. असे; प्राणहिंसेचे गुन्ह्यास देहान्त शिक्षा करावयाची असा त्याने निबंध केला. अशोकाप्रमाणेच सर्व राज्यांत प्रवाशांकरितां धर्मशाळा बांधण्यास आणि गरीब लोकांस आश्रयस्थाने व आजारी लोकांस औषधालये शहरांत व खेड्यांत बांधण्यास त्याने सुरुवात केली. या औषधालयांत वैद्याची व पथ्यपाण्याची योजना त्याने उदारपणे केली. त्याचप्रमाणे हिंदु व बौद्ध धर्माच्या लोकांकरितां त्याने पुष्कळ धार्मिक संस्था स्थापन केल्या. त्याच्या १ गौतम बुद्धाने जेव्हां आपला नवीन धर्म प्रगट केला तेव्हां तो केवळ संन्यास वृत्तीचा होता. आत्म्याचे अस्तित्व त्याला कबूल नसल्यामुळे मोक्ष म्हणजे निर्वाण होय. मनुष्याने सर्व संसार सोडून अरण्यांत जाऊन रहाणे व पूर्ण कर्मसंन्यास करणे हेच त्याचे ध्येय होते. बुद्धाचे मरणानंतर त्याचे अनुयायांना हा धर्म पसंत न पडून त्यांनी भक्तिधर्माचा अनुवाद करण्यास सुरुवात केली, आणि वैदिक धर्माप्रमाणे पूजा करण्याचा उपदेश ते करूं लागले. मनुष्याने कर्मसंन्यास न करितां लोकांवर उपकार करावे व त्यांच्या उपयोगी पडावे हे त्यांचे कर्तव्य आहे, असे ते म्हणू लागले. याचा मूळ उत्पादक नागसेन होता अशी समजूत आहे. या नव्या पंथाला महायान पंथ असें नांव पडले, व मूळच्या पंथाला हीनयान असे म्हणूं लागले. याबद्दलची विस्तृत माहिती डॉ. केर्न यांचे Manual of Indian Budlism या ग्रंथांत दिली आहे.