पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सन्य बंगालचाही लक्ष पायदळ ताल दुसरा करून आल राज्यवर्धनास मुलगा नसल्यामुळे, हर्ष सिंहासनारूढ झाला. आरंभी त्याने राजपुत्र शिलादित्य या नांवाने आपली द्वाही फिरविली. ( इ. स. ६०६ ). पण इ. स. ६१२ पर्यंत त्याला राज्याभिषेक झाला नाही. प्रथमतः तो आपल्या बहिणीचा तपास लावण्याच्या उद्योगास लागला. तिचा तपास विंध्यपर्वतांत लागला. ती बौद्ध धर्माच्या संमितिय संप्रदायांत फार निपुण होती. हर्षाने सर्व हिंदुस्थानांत एकछत्री राज्य करण्याचा बेत केला. ह्या वेळेस त्याच्या जवळ पांच हजार हत्ती, वीस हजार स्वार व पन्नास हजार पायदळ इतकें सैन्य होते. ह्या सैन्याच्या बळावर त्याने उत्तर हिंदुस्थान काबीज केलें; बंगालचाही बराच भाग घेतला, आणि त्याचे सैन्य साठ हजार हत्ती व एक लक्ष पायदळ इतके वाढले. दक्षिणेकडे मात्र चालुक्य वंशांतील दुसरा पुलकेशी याच्यापुढे त्याचे काही चालेना. हर्ष दक्षिणेत स्वारी करून आला, परंतु पुलकेशीनें नर्मदा नदीवर इतका कडेकोट बंदोवस्त केला होता की, हर्षाला तेथून परत जावे लागले. ( इ. स. १२०). यानंतर काही वर्षांनी वल्लभीचे ध्रुवभटाचा त्याने पराभव केला, व आनंदपूर, कच्छ, व दक्षिण काठेवाड प्रांतांचे राजे त्याला शरण आले. त्याची शेवटची स्वारी इ. स. ६४३ त गंजम प्रांतावर झाली. हाप्रमाणे हर्षाचे राज्य हिमालयापासून नर्मदेपर्यंत पसरले होते. ____ तो आपल्या राज्याची व्यवस्था स्वतः पहात असे, व पावसाळा शिवाय करून तो इतर ऋतूंत आपल्या राज्यांत फिरत असे. प्रवासांत मोंगल बादशहाप्रमाणे त्याचे मोठे तंबू वगैरे सामान नसे. बांबूच्या झोपड्यांतच त्याचा मुक्काम असे. मुक्काम हालला म्हणजे त्या झोपड्या जाळून टाकण्याचा परिपाठ होता असें बील यांच्या शोधावरून समजतें.