________________
एकच असल्याचे काही ग्रंथकारांनी लिहिले आहे. परंतु ते म्हणणे चुकीचे आहे असे मि. स्मिथ यांचे म्हणणे आहे. शिलादित्य धर्मादित्य नांवाचा मोलापो प्रांताचा राजा होता. ( इ०स०५९५६१० अगर ६१५). त्याचा पुतण्या ध्रुव भट हा वल्लभी ( वळा) प्रांताचा राजा होता. हा प्रांत पूर्व काठेवाडांत आहे. हर्ष राजाने या ध्रुव भटाचा पराभव केला, तेव्हां त्याने त्यास आपली मुलगी देऊन जावई केला. मोलापो हा मालव शब्दाचा अपभ्रंश असावा. त्या राज्याचे उत्तरेस गुर्जर राज्य होते; वायव्येस आनंदपूरचे व पूर्वेस अवंती ऊर्फ मालव प्रांत होता. या प्रांताची राजधानी उज्जनी हें नगर होते. या मोलापो ऊर्फ पश्चिम मालव प्रांताचा राजा शिलादित्य धर्मादित्य नांवाचा होता, त्याने इ०स० ५९५ पासून ६ १० किंवा ६१५ सालपर्यंत राज्य केले. हा बौद्ध धर्माचा असून त्याचा विद्वत्तेविषयीं व धार्मीकपणाविषयी फार लौकिक होता. हर्ष राजासही शिलादित्य म्हणतात.