पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/102

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लोकांची त्याने कत्तल केली. तो शिवभक्त होता. त्याने बुद्ध लोकांचा फार छळ केला. ह्यानंतर एक वर्षाच्या आंतच तो मरण पावला. त्याच्या मरणाच्या वेळेस नानाप्रकारचे अपशकुन झाले. पृथ्वीवर अंधार पडला; ती हालूं लागली; एक प्रचंड तुफान झाले; मेघगर्जना झाल्या, व गारांचा पाऊस पडला. त्याच्या मरणाचें साल ५४० असावें. __यशोधर्माने मिहिरकुलावर मिळालेल्या जयानिमित्त दोन जयस्तभ उभारले. त्यांत त्याने पप्कळ आत्मस्तति केली आहे. परंत ह-उएन-त्संग याचे म्हणणे ह्या जयाचे मुख्य श्रेय बालादित्त्यास देणे योग्य आहे. असें पडते. ३० स० ५६३ व ५६७ सालांच्या दरम्यान तुर्की लोक व इराणचा राजा खश्रू अनशीखान हे एकत्र होऊन त्यांनी हूण लोकांचा पराभव केला, व आशिया खंडांतील हूण लोकांचे राज्य लयास नेले. - ह्यानतर सुमारे ५०० वर्षे पावेतों हिंदस्थानावर परदेशाच्या लोकांची स्वारी आली नाही. मि. व्हिन्सेंट स्मिथ यांचा अभिप्राय असा आहे की, शक, यूएची, हूण वगैरे परदेशांतून आलेले सर्वच लाक हिंदुस्थान देश सोडून गेले असे नाही. त्यांचेपैकी बरेच यथ स्थाईक झाले, व हिंद समाजांत मिसळन गेले. त्यांपैकी वरील पलाक क्षत्रिय झाले. परिहार वगैरे ज्या रजपुतांच्या जाती आहेत त्या ह्या लोकांतनच उत्पन्न झाल्या. त्यांपेक्षा खालच्या दजोचे लोक गर्जर वगैरे जातीचे झाले, तसेच दाक्षणकड न मूळ रहिवाशी गोंड, भर, खरवार होते त्यांतूनच चंदेल, राठोड, गहरवार वगैरे रजपूत जाती झाल्या. हि-उएन-त्संग याने आपल्या प्रवासवर्णनांत मोलापो नावाच्या राज्याचा उल्लेख केला आहे. ते राज्य व उज्जनीचे राज्य