पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/101

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मांडलिक झाले असावेत. तोरमाण ६१० साली मृत्यु पावला. त्याचा मुलगा मिहिरकुल याने आपली राजधानी पंजाबांत शाकल (सिआलकोट ) या गांवीं स्थापन केली. हूण लोकांचे मुख्य ठिकाण हिरातजवळ बामिन हे होते. चिनी प्रवासी सोंग- यून हा ५१९ साली ज्या हूण राजाला भेटला, तो राजा इराणापासून चिनाच्या सरहद्दीपर्यंत चाळीस प्रांतांची खंडणी घेत असे. पुढचे साली सदर प्रवासी गांधारचा हूण राजा मिहिरकुल यास भेटला. __ह्या हूण लोकांचे वर्णन गिबन इतिहासकाराने दिले आहे, त्यावरून ते लोक फार क्रूर होते असे दिसते. ते मोठ्या व रुंद छातीचे असून त्यांची नाकें बसकी होती; व डोळे लहान व काळे होते. लढण्यास निघत तेव्हां ते कर्कश आरोळ्या मारीत. वेडेवांकडे हातवारे करीत व त्यांची एकंदर चर्या फारच ओंगळ दिसत असे. हिंदु लोकांना ह्या रानटी लोकांचा फारच तिटकारा येई व भयही वाटे. मिहिरकुलाचा क्रूरपणा असह्य होऊन हिंदुस्थानांतील राजे एकत्र झाले, व मगध देशाचा राजा बालादित्य व मध्यहिंदस्थानचा राजा यशोधर्म या दोघांना पुढे करून त्यांनी मिहिरकुलावर हल्ला केला व त्याचा पूर्ण पराभव करून त्यास पकडले. परंतु बालादित्याने त्याचा प्राण वाचविला, इतकेच नाही तर त्याची त्याच्या देशाकडे रवानगी केली. ___ मिहिरकुल कांही दिवस अज्ञातवासांत राहिला. पढ़ें तो का. श्मिरच्या राजाकडे गेला. त्या राजाने त्याला आश्रय दिला, व थोडासा प्रांतही त्याच्या ताब्यात दिला. परंतु ह्या कृतघ्न माणसाने आपल्या आश्रयदात्याविरुद्ध बंड करून त्याची गादी बळकाविली. काही दिवसांनी त्याने शेजारच्या गांधार राजावर स्वारी करून त्याला विश्वासघाताने ठार मारले. सिंधुनदीच्या काठावरील पुष्कळ