Jump to content

पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/100

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दोन नाबादशाहा ठार या धामधुमीत भाग ९ वा. --:.:-- हूण लोक. मध्य एशियाच्या मैदानांत मंगोल नांवाच्या फिरत्या टोळ्या राहात असत. त्यांत हूण नांवाचे लोक होते. ते लोक आपला प्रांत सोडून निघाले तेव्हां कांहीं युरोपांतील व्होलगा नदीकडे गेले, व कांही लोक आशिया खंडांत आक्ससनदीकडे गेले. जे लोक पूर्व यरोपांत शिरले त्यांनी तेथील गॉथ लोकांना डॅन्यूब नदीच्या दक्षिणेस हाकून लावले. ते गॉथ लोक रोमच्या साम्राज्यावर येऊन पडले. ह्या धामधुमीत इ. स. ३७८ व्या वर्षों व्हेलेन्स बादशाहा ठार झाला. हूण लोक व्होलगा व डॅन्यूब या दोन नद्यांमधील प्रांतावर पसरले. त्यांच्यांत आटिला नांवाचा एक पुढारी निघाला. त्याची दहशत कॉन्स्टॅटिनोपल व रॅव्हेना या दोन्ही राजधान्यांस पडली. आटिला ४५३ साली मरण पावला. त्यानंतर वीस वर्षांतच आशिया खंडाचा उत्तर प्रांतांतील नव्या टोळ्या आल्यामुळे हूण लोकांच्या युरोपांतील अंमल संपला. ___ आशिया खंडांत जे हूण लोक आले त्यांनी इराण देशावर हल्ला करून तेथील फिरोज नांवाच्या राजास इ. स. ३८४ साली मारल. तेथून त्यांच्या टोळ्या काबूल मार्गाने हिंदुस्थानांत शिरल्या. गाधार देशचे ( पेशावरचे ) राज्य घेऊन गुप्त साम्राज्याचा त्यांनी नाश केला. ह्या हण लोकांचा मुख्य सरदार तोरमाण नांवाचा होता. त्याने आपला अंमल इ. स. ५०० सालाच्या पूर्वीच माळव्यापर्यंत बसविला होता. त्याने आपणास महाराजाधिराज असा किताब लावून घेतला. भानुगुप्त व वल्लभीचा राजा हे त्याचे