________________
दुसरा कुमारगुप्त अल राजे झाले. यापुढे सुमारे अकरा राजे झाले त्यांपैकी शेवटचा दुरा जीवितगुप्त हा आठव्या शतकाच्या आरंभी गादीवर होता. सातव्या शतकांत आदित्यसेन नांवाच्या राजाने अश्वमेध याग केल्याचे वर्णन आहे. माळवा प्रांतांत ४८४ सालापासून ५१० सालापर्यंत बधगप्त व भानगुप्त नांवाचे राजे असल्याचे दिसते. नवव्या शतकाचे समारास मगध देश बंगालचे पाल राजाचे ताव्यांत गेला. पांचव्या शतकाचे शेवटी काठेवाडच्या पूर्व भागांत वल्लभी येथे एक राज्य स्थापन झाले होते ते ७७० सालापर्यंत चालले होते. हु-एन-त्संग तेथे गेला तेव्हां तें शहर चांगल्या भरभराटीच्या स्थितीत होते व तेथे गुणमति व स्थिरमति या नांवाचे दोन प्रसिद्ध बौद्ध शिक्षक सहाव्या शतकांत रहात असत. वल्लभी राजांचा अंमल - गेल्यानंतर काठेवाडची राजधानी अन्हिलवाडा-पाटण हे शहर झाले. पुढे पंधराव्या शतकांत अमदाबाद में राजधानी, ठिकाण झाले.