पान:भारत-मावळे मराठा-मेळा पदें.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पद ८ वे ॥ चाल ॥ आमचे काळे इंग्रजी चाळे ॥ दगड्या बोले बगडया न्हाव्याला । वंगाळ आल दिवस सकाळ धरन डोई मिळना पोट जाळव कस ॥१॥ इंग्रजी येते यासफ्यास करते म्हणून आली नवीन तन्हा बरी ॥ बोकडावानी केस डोईला दिसतो नाच्या खशेखरी ॥ २ ॥ उंटावानी बटा राखीतो डोइवरती जत तुर | जो तो म्हणतो दाढीच कररे वरती नग पुर पुर || ३ || गुलजार चेहरा नित्य दिसावा एक दिवसा आड दाढी करी । स्वहस्ताने आपण खर्डीतो न्हाव्या सारखी धोकटी घरीं ॥ ४ ॥ काव- ळ्यावानी जकड तक्रड टोप लागले रास्बाया । किरीस्ताव कां बामन ह्यो की गवाना बघ वळखाया |॥ ५ ॥ सुधा- नीताळ सोडीला उलटा आला काळ किती । थो कटी । घालून खुशाल करती आपल्या आपण हजामती ॥ ६ ॥ बूट पाटलुन शर्ट आंगीं पुर्डे आरसा दिसावासा | फेस सा- बूचा लावून वत्तारा घेऊन काही केस खसा खसा ॥७॥ बरा घेतला हाती वंदा इंग्रजी शिक्षणांत नाहीं मजा | वेळ प्रसंगी लशी भादरून गुजरान पोटाची करूं सदा ॥ ८ ॥ इंग्रजी शिकलेले मवाळ लोक टवाळ या धंद्यात असे तोटा न्हाव्याचा करूनी हलकटांनी पोटावर दिले पाय कमे ॥ ९ ॥ ह्मशी भादरून पूर्वी होतसे आमत्री गुजरान कशी बशी | विजायतच्या माकडांनी कातर आणुन पाडी- ले तोंडघशी ॥ १० ॥ बड़े लोक आणि पोर सोर फ्रेंच कट करती मिशीवरी । आईबप जणु याचे मेले काय असे वाटते खरोखरी ॥ ११ ॥ तैशाच स्त्रीया आता वागती विधवा पणाला सोडून तरी | शिक्षणामुळे कोळशे माकलेचे - ||