Jump to content

पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक पाचवे.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २ )

ब मुलकी बंदोबस्त -- तत्संबंधी कामगारांचा मुशाहिरा - चान्ही पुरु- पार्थ राजनीति, व – देशांतील शांतता.


भाग ३३ वा.
आर्यांची शासनपद्धति.

 राजा, व तन्नियुक्त प्रतिनिधि, त्यांचें न्याय करण्याचे काम- प्राचीन काळच्या व सांप्रतच्या स्थितीत बदल - पंचाचें सहाय्य - न्यायाधीशाच्या मनाची समता - मनुस्मृतींतील नानाविध विषय — फौजदारी अपराधांचें वर्गीकरण - त्यांतील गुणदोष — फौज- दारी कायद्यांतील शिक्षेचे प्रकार - दंडाची मर्यादा – तुलादि परीक्षण - साधारण अपवाद -असत्य भाषण करण्याविषयीं धर्म- शास्त्राचा निषेध --सत्याविषयीं हिंदूंची नैसर्गिक प्रीति- सत्याच्या अबाधित नियमांत, अपवादाने मर्यादा ठरविण्याचें कारण – अपरिहार्य उणीव तत्संबंधीं बेन्थँमचें मत - अनृत भाषणास अतिदारुण शिक्षा-दिवाणी बाबींचें नियमन - दिवाणी व फौजदारी बाबींचे मिश्रण -- कर्जवसुलाची रीती- व त्यापासून उद्भवणारे दुष्ट परिणाम - सरकारांत दाद मागित- ल्यावर, काम चालण्याची पद्धति व्याजासंबंधी नियम- तीन प्रकारची प्रमाणें- अप्रत्यक्ष प्रमाण — क्रिया, व शपथ, आणि तत्संबंधी प्राचीनकाळची समज - भोळ्यासमजूतीची कारणें- प्रत्यक्ष प्रमाण - साक्षीदारांसंबंधीं वयवर्ज्य विचार - पुराव्यां- तील मास गोष्टी—उपलब्ध असलेला साक्षीदार घेण्याची अवश्यकता – ग्राह्य व अग्राह्य गोष्टींचे विवेचन – पुराव्याचें बलाबल - लेख्यप्रमाण -जबरीने करून घेतलेल्या दस्तऐवजाचा परिणाम — करार - जामिनकी कयविक्रय - वेतन - निक्षेप -