Jump to content

पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक पाचवे.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३ )

तारणगहाण ठेव— मुदतीचा कायदा व त्याचें मूलतत्व - मुदतीची मर्यादा - अपवाद, आणि त्यापासून झालेला फायदा. -

भाग ३४ वा.
आर्याचें स्थानिक स्वराज्य.

 भरतभूमीतील स्थानिक स्वराज्य, व त्याचें बीज - त्याचे पुराणत्व - जीवनकलह, व त्याचीं मूलतत्त्वें- उदरपोषण, स्वसं- रक्षण, व स्वावलंबन - स्वपोपणाविषयींची तजवीज — स्वसंरक्ष- णार्थ बंदोबस्त - स्वसंरक्षणाच्या संबंधानें, वेदकालीन स्थिति - अनार्य लोकांचा बंडावा -अनार्यांची वशता काबीज केलेल्या प्रांतांतील शांतता व बंदोबस्त - ग्रामाधिपतींची योजना -नग राधिपति व त्यांचे काम देशाची संरक्षा -- स्वावलंबन - ग्राम- भृत, किंवा गांवनोकर— ग्रामरचना, व तिचें प्राचीन आणि अर्वाचीन स्वरूप- पाटील व त्यांचे कर्तव्य त्यांचें वजन --- गांव पंचायत - चावडी, किंवा पंचायत भरण्याची जागा - ग्रामसभेचें राजकीय किंवा सामाजिक दृष्टीने महत्व व तिचें प्रातिनिधिकत्व - लोकमताचें, ग्रामसभेत, आणि भारतवर्षांत, प्राबल्य – ग्रामसंस्थेची संघशक्ति, व पाटलाची इतिकर्तव्यता- चिल्हरखर्च, व आल्यागेल्याची बरदास्त — इतर सार्वजनिक खर्च, व त्याचा समाईक बोजा - किरकोळ बाबतींत पाटलाचा हुकूम, व तो अमलांत आणण्याविषयीं रयतेची तत्परता- पाटील व ग्रामाधिपतीचें वेतन — तत्संबंधी इनाम जमीन व रोकड नेमणूक -- पाटील हा प्रजेचा प्रतिनिधि, व सरकारचा नोकर — ग्रामलेखकाचें काम - इतर जमीनदारांची कामे, व त्यांचे हक्क — देशाधिकारी व देसमुख- -ग्रामयाजक— ग्रामज्योतिषी - ग्रामकर्मार - ग्रामतक्ष