Jump to content

पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक पाचवे.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६

[ भाग

भारतीय साम्राज्य.

संधिविग्रहादि कार्यंत ह्यांच्या हातीं साधारण घडामोड बहुत करून पुष्कळच असते, असें म्हणण्यास हरकत नाहीं. आणि क्वचित् प्रसंगी तर ह्यांच्यावर सर्व सत्ता व जवाबदारी सोंपलेली असते; त्यामुळें, नीतिविशारद व युक्तिमान् राजदूत, प्रतिपक्षाचें इंगित हरएक प्रकारें काढून घेऊन, आपल्या पक्षाचे हित करावयास कधीही सोडीत नाहींत, व मागेंही सरत नाहींत.

दूत एव हि संवत् भिनत्येव च संहतान् ।

दूतस्तत्कुरुते कर्म भिद्यन्ते येन वा न वा ॥ ६६ ॥
बुद्ध्वाच सर्व तत्त्वेन परराजचिकीर्षितम् ।

तथा प्रयत्नमातिष्ठेद्यथाऽऽत्मानं न पीडयेत् ॥ ६८ ॥

(मनुस्मृति. अ. ७.)

 प्रजाजनाचे संरक्षण होण्याच्या कामी, राजानें मुख्यत्वेकरून ज्या गोष्टी मनांत ठेविल्या पाहिजेत त्या ह्या कीं, प्रजा संरक्षण. ( १ ) शत्रूंच्या स्वाऱ्या व पारदेशिक आक्रमण, ह्या- पासून आपल्या राज्याचा सर्व प्रकारें बंदोबस्त ( २ ) आपल्या प्रजाजनाचा प्रकोप न होऊं देण्याविषयी योग्य खबरदारी; आणि ( ३ ) आपल्या मुलुखांत शांतता राखण्याविषयीं पूर्ण दक्षता. आतां बाहेरून परचक्र येऊन राज्याची खराबी होऊं नये ह्मणून, भूपतीनें उत्तम प्रकारची तयार फौज ठेवून, ठिकठिकाणीं दुर्गाश्रयाची