Jump to content

पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक पाचवे.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३२वा ]

१७

आर्योची राज्यव्यवस्था.

तजवीज केली पाहिजे. हे दुर्ग सहा प्रकारचे सांगितले असून, त्या सर्वात गिरिदुर्ग हा फारच महत्वाचा असल्या- विषय मनुस्मृतीत वर्णन आहे. कारण, प्राकारस्थ असा योद्धा शंभर असामींचा समाचार घेतो, व अशा प्रकारचे शंभर योद्धे दहा हजार इसमांस भारी होतात, यांत संशय नाहीं. मात्र अशा प्रकारच्या किल्यांत सर्व प्रकारची आयुधें व खड्गे असली पाहिजेत. इतकेंच नाहीं बाह्य परचक्राचा बंदोबस्त. तर, त्यांत धन, धान्य, व उदक, यांची समृद्धि असून, शिवाय करितुरगादिवाहनें, सर्व प्रकारची सामग्री, नाना प्रकारची यंत्रे, आणि तत्संबंधी कारागीर, यांची रेलचेल असली पाहिजे. व साधारणपणें ज्या ज्या वस्तूंची ह्मणून अशा ठिकाणी जरूर लागेल त्या त्या वस्तु ताबडतोब उप- लब्ध होतील, अशी चांगली तरतूद अवश्य राखली पाहिजे. नाही तर, शत्रूचा वेढा पडल्यावर सामग्री खुटल्यास सर्वांची दाणादाण होऊन तोंडचे पाणी पळेल; व सर्वत्र हाहा - कार होऊन सामनेवाल्याला शरण जाण्याची पाळी येईल.


१ धनुर्दुर्गे महीदुर्गमब्दुर्ग वार्क्षमेव वा ।

बृदुर्गे गिरिदुर्गे वा समाश्रित्य वसेत्पुरम् ॥ ७० ॥
सर्वेण तु प्रयत्नेन गिरिदुर्ग समाश्रयेत् ।

एषां हि बाहुगुण्येन गिरिदुर्गे विशिष्यते ॥ ७१ ॥

(मनुस्मृति अ. ७.)