Jump to content

पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक पाचवे.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४

[ भाग

भारतीय साम्राज्य.

निमग्न असणे, आणि वृथाभ्रमण करणें, यांतच विषयांध राजांचा सर्व काळ जातो. त्या योगाने प्रजा देखील व्यसनी होऊन, त्या दोघांचेंही मातेरें होतें. परंतु ह्या, व पैशुन्य, द्रोह, ईर्ष्या, असूया, अर्थाहरण, इत्यादि सर्व दुर्गुणांपासून राजानें अगदीं अलिप्त असले पाहिजे, म्हणून मनुस्मृतीत स्पष्ट आज्ञा आहे.
दश कामसमुत्थानि तथाऽष्टौ क्रोधजानि च ।
व्यसनानि दुरन्तानि प्रयत्नेन विवर्जयेत् ॥ ४५ ॥

( अ. ७. )


 तसेच, सदर्दू दोषांचें मूलकारण जो लोभ तोही राजानें सोडून देऊन, विपदावस्थेंत धैर्य, आपल्या उत्कर्ष- कालांत क्षमा, सर्भेत वाक्पांडित्य, युद्धांत पराक्रम, यशाची अभिरुचि, आणि वेदान्त श्रवणासाठी विशेष आसक्ति, इत्यादि त्यानें अभिव्यक्त केली पाहिजेत.
 याप्रमाणे विद्येसंबंधी राजाची स्वतःची तयारी असून, राजमंत्रि. राज्यकारभारांत मदत होण्याकरितां मंत्रिमंडल व सेवक वर्ग यांचीही योग्य पारख करून, त्यानें त्यांस आपल्या हाताशी राखिदें पाहिजे. हे मंत्री सात किंवा आठ असून, ते फार विश्वासूक


१ मौलाञ्छानविदः शूराँम्लन्भलक्षान्कुलोद्गतान् ।
स्वचिवान्सप्त चाचौ वा प्रकुर्वीत परीक्षितान् ॥ ५४ ।।

(मनुस्मृति भ . ७ . )