Jump to content

पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक पाचवे.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३२वा ]

१३

आर्यांची राज्यव्यवस्था.

मन्त्राज्ञा. मोठीच अवश्यकता आहे. तो आत्मविद्या, दंडनीति, व तर्कविद्या, ह्यांत निपुण असला पाहिजे. कृषिकर्म, वाणिज्य आणि पशुपाल- नादि क्रिया, यांत त्यानें त्या त्या प्रकारच्या माहितगार लोकांकडून, हरएक तऱ्हेचें ज्ञान संपादन केलें पाहिजे. तो रणशूर, विद्याविलासी, आणि साहसी असून, शमदमादि गुणांत निपुण असला पाहिजे. हा शेवटला गुण ज्या राजाच्या अंगी असेल, तो खरोखर अमोलिक हिराच, असें समजण्यास हरकत नाहीं. कारण, ज्याने आपल्या मनावर दाव ठेवून, चक्षुरादि बाह्येन्द्रियांचाही निग्रह केला, त्याचा प्रजेवर पूर्ण अम्मल बसतो. व 'यथा राजा तथा प्रजा' या म्हणीप्रमाणें, ती देखील तदनुसारी होते. परंतु हेच गुण त्याच्यांत नसले तर, त्यापासून उलट परिणाम होतो. राजा कामान्व असला म्हणजे अर्थातच स्त्रीलंपट असतो, आणि स्त्रीच्या ठिकाणी कोणाचीही अतिरिक्त आसक्ति असली तर, त्याला एकाएकी चैन पडेनासें होतें. मग त्याचा अचुक परिणाम म्हटला म्हणजे, मनास वाटतील ते सूक्त असूक्त व्यापार करून, त्या मनाला येनकेन प्रकारेण रिझविणें, हा होय. मृगया करणें, अक्षादि क्रीडा खेळणे, सकलकार्यवित्रातिनी अशी दिवसा निद्रा घेणें, परदोष कथनानें आनंद वाटणें, निशिदिनी स्त्रीसंभो- गांत रममाण होणें, मद्यपान करणें, नृत्य गीत वाद्यादिकांत