Jump to content

पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक पाचवे.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२

[ भाग

भारतीय साम्राज्य.

सारासार विचार करणारा, व प्रज्ञाशाली असून, धर्मार्थ- काम मोक्षादि विषयांत तो स्वतः निपुण असला पाहिजे. अशा प्रकारचा सर्वगुणसंपन्न राजा असल्यास, त्याची सर्वत्र कीर्ति होऊन प्रजा देखील सुख पावते. आणि तोच राजा दुष्ट व अविचारी असल्यास, अखिल प्रजा संत्रस्त होऊन, पुत्र व बंधु, दुर्ग व राष्ट्र, यांसहित त्याची हानि होते. ह्या करितां, राजानें, यथान्याय वर्तण्यासाठी, आपण होऊनच प्रजेला कित्ता घालून दिला पाहिजे; आणि नित्यशः सविनय असे वर्तन ठेवून, प्रतिदिनीं त्यानें नीतिशास्त्राभिज्ञ अशा विद्वान् ब्राम्हणांची सल्ला व मसलत घेतली पाहिजे. तसेंच कोणी वयोवृद्ध असून, फार अनुभविक व मर्मज्ञ असेल तर, त्याच्याही दोन गोष्टी ऐकून लोककल्याणार्थ आपली काया राजानें झिजविली पाहिजे.
 विनयाचें माहात्म्य मनुस्मृतीत फारच सांगितले आहे. व तें इतकें कीं, विनयालंकृत कोणी मनुष्य असेल तर त्याला राजपदप्राप्ति होते. परंतु, तोच तत्पराङ्मुख असल्यास स्वपदभ्रष्ट होऊन, शेवटीं लयासही जातो.

बहवोऽविनयाना राजानः सपरिच्छदाः ।
वनस्था अपि राज्यानि विनयात् प्रतिपेदिरे ॥ ४० ॥

( अ. ७.)
विनयाप्रमाणें इतर गुणांची देखील राजाच्या अंगीं मो-