Jump to content

पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक पाचवे.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३२वा ]

११

आर्यांची राज्यव्यवस्था.

चन केलें आहे. प्रथमतः जगदुत्पत्तीचे आदिकारण सांगून क्रमाक्रमानें त्यानें राजधर्माचे सर्व प्रकार लिहीले आहेत.

अराजकेहि लोकेस्मिन सर्वतो विदुते भयात् ।

रक्षार्थमस्य सर्वस्य राजानमसृजत् प्रभुः ॥ ३ ॥
सोऽग्निर्भवति वायुश्च सोऽर्कः सोमः सधर्मराट ।
सकुबेरः सवरुणः समहेन्द्रः प्रभावतः ॥ ७ ॥
बालोऽपिनावमन्तव्यो मनुष्यइतिभूमिपः
महती देवताह्येषा नररूपेण तिष्ठति ॥ ८ ॥
यस्यप्रसादे पद्माश्रीर्विजयश्च पराक्रमे ।
मृत्युश्चवसति क्रोधे सर्व तेजोमयोहिसः ॥ ११ ॥
दंडः शास्ति प्रजाः सर्वा दंड एवाभिरक्षति ।
दंड: सुतेषुजागर्ति दंडधर्मं विदुर्बुधाः ॥ १८ ॥
सर्वोदंडजितो लोको दुर्लभो हि शुचिर्नरः ।

दंडस्यहि भयात्सर्वं जगद्भोगाय कल्पते ॥ २२ ॥


( मनुस्मृति. अ.७ )
ह्याप्रमाणें प्रजाजनाचें यथोचित संगोपन होण्यासाठींच राजा निर्माण झाला असून, त्याच्यांत राजाची इतिकर्त- व्यता. पंचमहाभुतांचें तेज व शक्ती आहे, अशी पूर्वीच्या काळची समज होती. राजा बालक असला तथापि, तो केवळ देवतारूपच असल्यामुळे त्याचा कोणत्याही प्रकारें अवमान करूं नये, अशी सक्तीची मन्वाज्ञा आहे. राजा देखील सत्यवादी, न्यायी,