Jump to content

पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक पाचवे.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०

[ भाग

भारतीय साम्राज्य.

आर्याचें तत्संबंधीं दूरदात्र.  प्रजा यांचे परस्पर धर्म, त्यांची इति कर्तव्यता, त्यांचे बलाबल, व एकदर राजकीय व्यवहार, याविषयीं सविस्तर विवेचन त्यांनीं आज सुमारें पांच सहा हजार वर्षांपूर्वीच केलेले दिसून येतें. त्यावरून आमची प्रजापरिपालनदक्षता, शासन परिशीलन, आणि तत्संबंधी पौराणत्व, हीं कोणाच्याही लक्षांत आल्यावांचून राहणार नाहींत.
 धर्मशास्त्राची मूलतत्वें ज्यांत विकीर्ण झाली आहेत, असे ग्रंथ अनेक आहेत. परंतु ज्यांत पद्धतशीर विषयविन्यास आहे असा मनुस्मृति. अति प्राचीन ग्रंथ म्हटला म्हणजे मनुस्मृति होय. हा प्रसिद्ध स्मृतिकार इ० स० पूर्वी सुमारे एक हजारे १००० वर्षे होऊन गेला असून, त्यानें मानवी धर्मासंबंधी सर्व विवे-
१ धर्म शास्त्राची मूळ खाण ह्यटली ह्मणजे वेदांतील गृह्यसूत्रे होत. तदनंतर, सामयाचारिक नांवाचीं अपस्तंब श्रौत सूत्रे, व गौतम, विष्णु, वशिष्ठ, बौध्यायन, इत्यादिकांचीं धर्मसूत्रे उदयास आलीं; आणि उश- नस्, काश्यप, बुद्ध, हारीत, इयादि स्मृतिकार होऊन गेले.
2. “ Schlegel was confident that it (Manu's date ) could not be later than 1,000B. C. "
(Dr. Hunter's Indian Empire.)
 सरविल्यम् जोन्स यांच्या मतें मनूचा काल, इ० स० पूर्वी १२५० पासून ५०० वर्षे पर्यंत असावा.